Rinku Rajguru Dainik gomantak
मनोरंजन

Happy Birthday Rinku Rajguru: रिंकूचं आयुष्य असं झालं 'सैराट’...

Rinku Rajguru: रिंकूला पहिल्याच चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती.

दैनिक गोमन्तक

‘सैराट’ (Sairat) चित्रपट आला अन् रिंकू राजगुरूने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. मराठी मनोरंजन विश्वात या चित्रपटाने अनेक नवे विक्रम नोंदवले. या चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकलेले दोन्ही कलाकार अजूनही ‘आर्ची’ आणि ‘परशा’ या नावानेच ओळखले जातात. यावरूनच या चित्रपटाची क्रेझ लक्षात येते. या चित्रपटात आर्चीची भुमिका साकारणारी रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. रिंकूने ‘आर्ची’ बनून प्रेक्षकांच्या मनं जिकंली आहे. (Happy Birthday Rinku Rajguru News)

एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप, हा रिंकूचा प्रवासही फिल्मी होता. पहिल्याच चित्रपटाने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती. ‘सैराट’ चित्रपटाने रिंकू राजगुरूचं आयुष्य बदलूनच टाकलं.

'सैराट' चित्रपटाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रात यशाचा झेंडा रोवला नाही, तर महाराष्ट्राबाहेरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला. रिंकू राजगुरूची ओळख आता महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात झाली. ‘सैराट’ या चित्रपटाचे रिमेक अनेक भाषांमध्ये बनवले गेले. बॉलिवूडमध्येही (Bollywood) जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांना घेऊन, याच कथानकावर आधारित 'धडक' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.

तसे तर रिंकूचा चित्रपट किंवा चित्रपट जगताशी कोणताही संबंध नव्हता. एकदा मराठी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना काही कामानिमित्त सोलापूरला जावे लागले. नागराज मंजुळेसारख्या प्रसिद्ध व्यक्तीला भेटण्यासाठी उत्सुक असलेल्यांमध्ये रिंकूचाही समावेश होता. त्यावेळी नागराज मंजुळे त्यांच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीसाठी ग्रामीण भागातील मुलीच्या शोधात होते. रिंकू राजगुरुला पाहून त्यांना वाटले की, हीच मुलगी त्यांच्या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी योग्य आहे. लगेच घाईघाईत रिंकूचे देखील ऑडिशन घेण्यात आले आणि तिची 'सैराट' या चित्रपटासाठी (Movie) निवड झाली.

2016 मध्ये रिलीज झालेल्या 'सैराट'नंतर रिंकूमध्येही बरेच बदल झाले आहेत. सैराटच्या वेळी सोलापूरच्या एका छोट्या गावातून आलेली रिंकू सध्या सोशल मीडियावर (Social Media ) चांगलीच सक्रिय आहे. वेस्टर्न आणि मॉडर्न ड्रेस घातलेली रिंकू तिच्या चाहत्यांनाही खूप आवडते. ‘सैराट’नंतर रिंकू राजगुरूने ‘कागर’, ‘मेकअप’, 'झुंड' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT