Hansika Motwani Dainik Gomantak
मनोरंजन

Hansika Motwani Wedding: हंसिकाला मिळाला सपनों का सौदागर! 4 डिसेंबरला घेणार सात फेरे

तिचा जोडीदार नक्की कोण असणार, याची उत्सुकता अनेकांना लागली होती

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूडमधील अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल नुकतेच लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) डिसेंबर महिन्यात आपल्या स्वप्नातील राजकुमारासोबत लग्न करणार आहे. मालिका ते चित्रपट असा प्रवास करणारी अभिनेत्री हंसिका अखेर लग्न करणार असल्याने, तिचा जोडीदार नक्की कोण असणार, याची उत्सुकता अनेकांना लागली होती

'शका लाका बूम-बूम' या लोकप्रिय मालिकेमधून अभिनयाचा प्रवास सुरू करणाऱ्या हंसिकाने अनेक साउथ चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री मुख्य भुमिका केली आहे. हंसिकाने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनेत्री हंसिकाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. अल्लू अर्जुनसह अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलेली हंसिका डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हंसिका येत्या 04 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. हंसिकाच्या लग्नाची तयारी 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हे डेस्टिनेशन वेडिंग असेल, ज्यात दोघांच्या कुटुंब सदस्यांव्यतिरिक्त जवळचे मित्र देखील उपस्थित असतील.

हसिंकाचा पती कोण?

जयपूरमध्ये हे लग्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जयपूरमधील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये हंसिकाचे लग्न होणार आहे. पण हसिंकाच्या पतीचे नाव अद्याप समोर आलेलं नाही. मात्र ती सोहेल कथोरिया नावाच्या व्यावसायिकासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा संघात येणार 'नवा पाहुणा'! फलंदाजी होणार भक्कम; थेट कर्णधारपदी होणार निवड?

Bogmalo Accident: भरधाव दुचाकीने दिली धडक, चालक उडून पडला रस्त्यावर; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Amthane Dam: ‘आमठाणे’वरील गेट दुरुस्त होण्याची प्रतीक्षा! दुरुस्तीकाम लांबणीवर पडल्याने गोंधळ; धरणात पाणीसाठा कमीच

Goa Coconut: नारळांसाठी गोवा परराज्यांवर अवलंबून! हॉटेल्स, रेस्टॉरंट्स वाढीमुळे वापर वाढला; कृषिमंत्री नाईकांनी दिली माहिती

Goa Live News: नोंदणीकृत मालवाहू ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक झाडाला धडकला

SCROLL FOR NEXT