Hansal Mehta 
मनोरंजन

Hansal Mehta: 'तू निर्लज्ज माणूस आहेस...' हंसल मेहताच्या 'फराज' चित्रपटावर युजर्सचा संताप, दिग्दर्शकाने दिले हे उत्तर

दिग्दर्शक हंसल मेहता यांना सोशल मिडीयावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे

Rahul sadolikar

Hansal Mehata Trolled by User : सोशल मिडियावर कधी कुणाला ट्रोलिंगचा सामना करावा लागेल हे सांगणं मुश्कील असतं. आता प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांना युजरनी ट्रोल केलं आहे. यावर त्यांनीही उत्तर दिलं आहे

हंसल मेहता (Hansal Mehata) यांचे नाव बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. हंसल मेहता हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत. ू ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्या प्रतिक्रिया देत असतात, त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे त्यांना कधीकधी ट्रोलचा सामनाही करावा लागतो. 

अलीकडे हंसल मेहता त्याच्या आगामी 'फराज' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हंसल मेहताला त्याच्या चित्रपटासाठी सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.

हंसल मेहता सतत सोशल मीडियावर ट्रोलला बळी पडत आहेत. ट्विटरवर प्रतिक्रिया देताना एक युजर म्हणाला, 'तुला स्वतःची लाज वाटली पाहिजे. तू निर्लज्ज माणूस आहेस. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी वेदनादायक शोकांतिका वापरत आहात आणि यासाठी तुम्हाला पीडितांच्या कुटुंबीयांशी बोलण्याची गरजही वाटली नाही. 

तुमच्या देशात घडलेल्या घटनांवर तुम्ही चित्रपट का बनवत नाही?' ही कमेंट येताच हंसल मेहता यांनीही त्या कमेंटवर आपली प्रतिक्रिया दिली.

या टिप्पणीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना हंसल मेहता यांनी त्यांच्या आगामी 'फराज' चित्रपटावरील एक बातमी शेअर केली ज्यामध्ये कलेच्या स्वातंत्र्याबद्दल चर्चा केली गेली. 

हंसल मेहता यांनी त्या व्यक्तीला प्रत्युत्तर दिले ते म्हणाले, 'मला आशा आहे की हा भाग वाचल्यानंतर तुम्ही या विषयावर अधिक संतुलित विचार करू शकाल. कृपया ते वाचा.'  काही युजर्सनीही कमेंट बॉक्समध्ये हंसल मेहताला सपोर्ट केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Horoscope 7 October 2026: गुंतवणुकीसाठी शुभ दिवस, बँक बॅलेन्समध्ये होणार तगडी वाढ! बुधवार ठरणार 'या' राशींसाठी गोल्डन डे

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

SCROLL FOR NEXT