Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding Dainik Gomantak
मनोरंजन

Rakul Preet Singh-Jacky Wedding: ठरलं तर! रकुलच्या लग्नासाठी गोव्यात येणार बॉलीवूडचे 'हे' कलाकार

Rakul Preet Singh-Jacky Wedding: पाहुण्यांना नो-फोटो पॉलीसी पाळावी लागणार आहे.

दैनिक गोमन्तक

Rakul Preet Singh-Jacky Wedding: बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी आता लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. गोव्यात २१ फेब्रुवारी २०२४ ला ते विवाहबंधनात अडकणार आहेत. या सेलेब्रिटी जोडप्याच्या लग्नात बॉलीवूडचे कोणते कलाकार हजेरी लावणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.

आता न्यूज १८ मिडिया हाऊसच्या रिपोर्टनुसार, रकुलच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे हे गोव्याकडे रवाना झाल्याचे म्हटले आहे.

याबरोबरच, असे म्हटले जात आहे कि पूजा एंटरटेनमेंट बरोबर जे जोडले गेले आहेत ते सगळे कलाकार या लग्नात सहभागी होणार आहेत. पूजा एंटरटेनमेंट हे जॅकी भगनानीच्या वडीलांचे म्हणजेच निर्माते वाशु भगनानी यांचे आहे. अक्षय कुमार, वरुण धवण, शाहिद कपूर, टायगर श्रॉफ हे रकुल आणि जॅकीच्या आनंदात सहभागी होण्याच्या शक्यता आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार गोव्यात आयटीसी ग्रॅट गोवा या लक्झरी हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाच्या विधी पार पडणार आहेत. 21 फेब्रुवारी २०२४ हे लग्न होणार आहे. महत्वाचे म्हणजे ३ दिवस लग्नाचा सोहळा असणार आहे. हे जोडपे पर्यावरणपूरक लग्न करणार असल्याने मोठ्या चर्चेत आहे. आता असेही म्हटले जात आहे की, त्यांच्या या सोहळ्यादरम्यान पाहुण्यांना नो-फोटो पॉलीसी पाळावी लागणार आहे.

म्हणजेच त्यांच्या लग्नाचे फोटो लीक होऊ नयेत यासाठी हा विचार केल्याचे म्हटले जात आहे. हे जोडपे शनिवारीच गोव्यात पोहचले असून आता त्यांच्या लग्नाचा उत्सव पाहण्यास चाहते उत्सुक असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. दरम्यान, बॉलीवूड कलाकारांबरोबच साऊथ चित्रपटसृष्टीतील कलाकारदेखील रकुल आणि जॅकीच्या लग्नात उपस्थित राहू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Cavelossim Assolna bridge: केळशी-असोळणा पुलाची धोकादायक फट बुजवली, वॉरन यांनी वेधले लक्ष; 4 तासांत रस्‍त्‍याची दुरुस्‍ती

SCROLL FOR NEXT