Ganapath Teaser Release Dainik Gomantak
मनोरंजन

Ganapath Teaser Release: 'गणपत'च्या टीझरची भल्याभल्यांना भूरळ

Ganapath Teaser Release: जागतिक दर्जाचा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यात जॅकी भगनानीने कोणतीही कसर सोडली नसल्याचे या चित्रपटाच्या टीझरमधून दिसते.

दैनिक गोमन्तक

Ganapath Teaser Release: गणपत या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलिज झाला आहे. आता हा टीझर प्रेक्षकांना इतका आवडला आहे की, भारतीय चित्रपटसृष्टीची उंची हा चित्रपट वाढवेल असे म्हटले जाऊ लागले आहे.

पूजा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'गणपत' हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घालण्याची ताकद ठेवतो. हा टीझर 'गणपत'च्या चित्रपटाची उत्तम झलक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटाला टक्कर देतो. उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स आणि 'गणपत' ची अप्रतिम कथा या टीझरमध्ये दिसत आहे.

उत्कृष्ट व्हीएफएक्स गणपतला इतर चित्रपटांपेक्षा वेगळे बनवतो. भारतात असा प्रयत्न क्वचितच झाला आहे. जागतिक दर्जाचा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यात जॅकी भगनानीने कोणतीही कसर सोडली नसल्याचे या चित्रपटाच्या टीझरमधून दिसते.

'गणपत' ची कास्टिंग

'क्वीन' आणि 'सुपर 30' फेम विकास बहल दिग्दर्शित 'गणपत' या अॅक्शन चित्रपटात टायगर श्रॉफ, क्रिती सॅनन आणि मेगास्टार अमिताभ बच्चन हे प्रसिद्ध कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. टीझरमध्ये क्रिती सेनन जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. याबरोबरच अमिताभ बच्चन यांच्या व्हॉईस ओव्हरने देखील प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.

'आम्ही आमचा सर्वात मोठा चित्रपट घेऊन येण्यास उत्सुक आहोत. 'गणपत: अ हिरो इज बॉर्न' हा अफाट उत्कटतेने आणि अनोख्या दृष्टीने बनलेला चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अनेक आश्चर्याचे धक्के मिळतील असे जैकी भगनानी यांनी म्हटले आहे. जसजसा 'गणपत' चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जवळ येत आहे तसतसे हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीला पुन्हा एका वेगळ्या उंचीवर नेणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

आता टीझरने ज्याप्रकारे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत त्या अपेक्षा गणपत चित्रपट पूर्ण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT