Gadar 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Gadar 2: 'गदर 2' ला सेन्सॉर बोर्डाची कात्री, हे सीन हटवले!

Gadar 2: सनी देओलचा आगामी चित्रपट 'गदर 2' ला सेन्सॉर बोर्डाने UA प्रमाणपत्र दिले आहे. चित्रपटात एकूण 10 कट करण्यात आले आहेत.

Manish Jadhav

Gadar 2: सनी देओलचा आगामी चित्रपट 'गदर 2' ला सेन्सॉर बोर्डाने UA प्रमाणपत्र दिले आहे. चित्रपटात एकूण 10 कट करण्यात आले आहेत, त्यानंतर निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाकडून हे प्रमाणपत्र मिळवण्यात यश आले.

दंगलीचे दृश्य ज्यामध्ये लोकांना 'हर हर महादेव'चा जयघोष करताना दाखवण्यात आले होते, ते चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे, तर 'शिव तांडव'चे दृश्यही बदलून त्याऐवजी 'अखंड है.. वो वो संग है' असे गाणे देण्यात आले आहे. त्याचबरोबर शिव्या असणारा भागही हटवण्यात आला आहे.

चित्रपटातून काही सीन्स हटवण्यात आले

याशिवाय, जिथे 'तिरंगा' हा शब्द वापरला जात होता, तो बदलून 'ध्वज' करण्यात आला आहे. वृत्तानुसार, चित्रपटाचे (Movie) इतर अनेक संवाद देखील बदलण्यात आले आहेत, ज्यात भगवद्गीता आणि कुराणचा संदर्भ असलेल्या संवादाचा समावेश आहे.

TOI च्या रिपोर्टनुसार, चित्रपटात एका ठिकाणी संरक्षण मंत्र्यांना चुकीचे संबोधित करण्यात आले होते, जे बदलून 'रक्षा मंत्री' करण्यात आले आहे.

गदर-2 चा रन टाइम किती असेल?

चित्रपटात अशी काही दृश्ये आहेत, ज्यासाठी सेन्सॉर बोर्डाने डॉक्यूमेंट्री प्रूफ मागितले आहेत. यामध्ये 1971 च्या भारत (India) -पाक युद्धासह अनेक दृश्यांचा समावेश आहे. यामध्ये मंत्र आणि श्लोकांच्या जपाच्या काही दृश्यांचाही समावेश आहे.

या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डापुढे ए प्रमाणपत्र मिळत होते, परंतु निर्मात्यांना त्यांचा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असे वाटत होते.

आता अनेक सीन्स कापल्यानंतर अखेर निर्मात्यांना यूए प्रमाणपत्र मिळाले आहे. एडिटिंगनंतर, चित्रपटाचा एकूण रनटाइम आता 2 तास 50 मिनिटे आहे.

OMG-2 आणि गदर-2 एकाच तारखेला प्रदर्शित होणार

OMG-2 आणि गदर-2 हे दोन्ही चित्रपट एकाच तारखेला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत. दोन्ही चित्रपटांबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'गदर-2'चा ट्रेलर आधीच रिलीज झाला असतानाच प्रेक्षक ओएमजी-2च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आता 3 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT