Kapil Sharma ,Sunny Deols ,Karan Deol Dainik Gomantak
मनोरंजन

Karan Deol Reception: शत्रुघ्न सिन्हा ते सलमान खान, सिताऱ्यांच्या हजेरीने सजली मैफील; पाहा व्हिडीओ

Karan Deol: धर्मेंद्र आणि सनी देओल स्वत: सर्वांच्या स्वागतासाठी हजर होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Karan Deol: बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता सनी देओलच्या घरी मोठ्या उत्साह दिसून येत आहे. या उत्साहाचे कारण म्हणजे सनी देओलचा मुलगा करण देओल नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. करणने द्रिशा सोबत लग्नगाठ बांधली आहे.

गेल्या काही दिवसापासून धर्मेंद्र, सनी देओल करण देओलच्या लग्नामुळे सातत्याने चर्चेत आहेत. या लग्नसंमारंभात संपूर्ण देओल कुटुंब आनंदाने एकत्रित आलेले दृश्य पाहायला मिळाले आहे. आता बॉलीवूडच्या स्टार अभिनेत्यांनी करणच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान ब्लॅक सूटमध्ये तर मिस्टर परफेक्शिनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अमिर खान कॅज्युअल मध्ये दिसून आला. कपील शर्माने धर्मेंद्र, रणवीर, दीपीका आणि त्याची पत्नी गिन्नी यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता.

पूनम धिल्लीयन आपल्या मुलांसोबत तर बॉबी देओलदेखील आपल्या मुलांसोबत दिसून आला होता. अनुपम खेरने देखील नवीन जोडप्यासोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर करत खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

'करण आणि द्रिशा तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा ! संपूर्ण देओल कुटुंबाला माझ्या मनापासून शुभेच्छा , हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील हे कुटुंब म्हणजे प्रेमळ आणि खऱ्या लोकांनी संपूर्ण असे आहे. मला नेहमीच त्यांच्याबद्दल खूप प्रेम वाटते. देव तुम्हाला खूप आनंदी ठेऊ दे 'असं म्हणत अनुपम खेर यांनी अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शत्रुघ्न सिन्हांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत धर्मेंद्र यांची गळाभेट घेतल्याचे दृश्य समोर आले आहे. दोघांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे. दृश्यम फेम इशिता दत्ता देखील या रिसेप्शनमध्ये दिसून आली. धर्मेंद्र आणि सनी देओल स्वत: सर्वांच्या स्वागतासाठी हजर होते. करण आणि द्रिशाने हिंदू पद्धतीने जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT