Honey Singh Dainik Gomantak
मनोरंजन

Honey Singh Alleges Threats: आधी सिद्धू मुसेवाला अन् आता...; गोल्डी ब्रारकडून पंजाबी गायकाला हत्येची धमकी

Honey Singh: सिद्धू मुसेवालाच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

दैनिक गोमन्तक

Honey Singh: प्रसिद्ध गायक हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहीती समोर आली आहे. हनी सिंगने दिल्ली पोलिस ठाण्यामध्ये केलेल्या तक्रारीनुसार, कॅनडामध्ये राहणाऱ्या गॅंगस्टर गोल्डी ब्रारने हनी सिंगला ही धमकी दिली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, हनी सिंगचा मॅनेजर रोहित छाब्राच्या फोन नंबरवर ही धमकी दिली गेली आहे. फोन करणाऱ्याने आपली ओळख गोल्डी ब्रार अशी सांगितली आहे. जर 50 लाख रुपए मिळाले नाहीत, तर हनी सिंगला जीवे मारण्यात येईल असे या धमकीमध्ये म्हटले आहे.

या धमकीनंतरदेखील अनेक कॉल्स आणि व्हॉइस नोट त्याच फोन नंबरवरुन पाठवले असल्याची माहीती वरिष्ठ पोलिस अधिकारी हर्षद सिंग यांनी म्हटले आहे. ज्या नंबरवरुन ही धमकी देण्यात आली त्याचा पोलीस तपास घेत आहेत.

धमकीची व्हॉईस नोट मिळाल्यानंतर हनी सिंगने दिल्ली पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली. त्याचबरोबर स्पेशल सेलचे स्पेशल सीपी एचजीएस धालीवाल यांचीही भेट घेतल्याची माहीती मिळाली आहे.

दरम्यान, गोल्डी ब्रार सिद्धू मुसेवालाच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. गोल्डीचे पूर्ण नाव सतविंदरजीत सिंग आहे. तो सध्या कॅनडामध्ये राहतो. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी व अनेक फौजदारी खटले प्रलंबित आहेत.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा भाईजान सलमान खानलादेखील धमकीचे फोन आले होते. त्यावेळीदेखील गोल्डी ब्रारचे नाव समोर आले होते. आता पोलिस या प्रकारणाचा अधिक तपास घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Gochar 2026: शनीचे 'महागोचर'! 5 राशींच्या लोकांना बनवणार करोडपती आणि भाग्यवान; आयुष्यात येणार सुखाचे दिवस

Maharashtra ATF VAT Reduction: विमान प्रवाशांसाठी गुड न्यूज! फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय; विमान इंधनावरील 'व्हॅट' थेट 18 टक्क्यांवरुन 7 टक्क्यावर

PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT