पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध प्रोड्यूसर आणि संगीतकार बंटी बेन्स (Bunty Bains) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. आज मोहालीच्या सेक्टर-79 येथील रेस्टॉरंटबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
गोळीबारादरम्यान त्यांनी रेस्टॉरंटमध्ये घुसून आपला जीव वाचवला. गोळीबारानंतर बंटी बेन्स यांना फोन करुन त्यांच्या जीवाच्या बदल्यात एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.
हल्लेखोरांनी धमकी दिली की, '1 कोटी रुपये न दिल्यास यावेळी तु सुटला आहेस, पण पुढच्या वेळी मात्र सुटणार नाही.' दरम्यान, या हल्ल्याची लेखी तक्रार बंटी बेन्स यांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंटी यांनी हा हल्ला घडवून आणण्यासाठी मोस्ट वॉन्टेड गँगस्टर लकी पटियालवर संशय व्यक्त केला आहे. लकी पटियाल सध्या कॅनडामध्ये (Canada) आहे. बंबिहा आणि लॉरेन्स या गॅंग एकमेकांच्या शत्रू आहेत. लकी पटियाल कॅनडामध्ये बंबीहा गॅंगचे नेतृत्व करतो. दुसरीकडे, बंटी बेन्स यांचे सिद्धू मूसेवाला याच्याशी खास संबंध होते. बंटी यांनी मूसेवालाची अनेक गाणी संगीतबद्ध केली. विशेष म्हणजे, मूसेवालाने बंटीला पंजाबी इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यास मदत केली.
दरम्यान, 2 वर्षांपूर्वी 29 मे 2022 रोजी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोन कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर सुमारे 30 राऊंड फायरिंग केले होते, ज्यातून 19 गोळ्या मूसेवाला याला लागल्या होत्या. हा हल्ला मानसा शहरात झाला होता. या हत्याकांडाचे सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.