Farhan Akhtar  Dainik Gomantak
मनोरंजन

Farhan Akhtarच्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांसाठी वाईट बातमी...

अभिनेता,दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे

Rahul sadolikar

Farhan Akhtar Latest News: दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दोबारा, लक्ष्य यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक फरहान अख्तरने त्याच्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांना एक वाईट बातमी दिली आहे. फरहान अख्तरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर आगामी ऑस्ट्रेलियन दौऱ्याबाबत एक घोषणा केली आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट करत फरहान अख्तरने चाहत्यांसोबत या महिन्यात त्याच्या बँडचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द झाल्याची माहिती दिली.

बॉलिवूडचा एक वेगळ्या शैलीचा अभिनेता, लेखक आणि गायक फरहान अख्तर अलीकडेच त्याची पत्नी शिबानी दांडेकरसोबतच्या पहिल्या वाढदिवसामुळे चर्चेत होता.  अभिनेत्याने त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह एक फोटो शेअर करून शिबानीवरील प्रेम व्यक्त केले. 

त्याचवेळी फरहानने एक अशी पोस्ट टाकली आहे, जी त्याच्या चाहत्यांचे हृदय तोडू शकते. आपल्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांना उद्देशून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. फरहान काय म्हणाला जाणून घेऊया.

फरहान अख्तरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर आगामी ऑस्ट्रेलियन दौऱ्याबाबत एक घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये फरहान अख्तरने चाहत्यांसोबत या महिन्यात त्याच्या बँडचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द झाल्याची माहिती दिली. 

काही अनपेक्षित परिस्थितीमुळे हा महिना रद्द करण्यात आला आहे, असे अभिनेत्याने लिहिले. अचानक झालेल्या बदलांबद्दल फरहानने निराशा व्यक्त केली.

फरहान अख्तरने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'ऑस्ट्रेलियातील माझ्या चाहत्यांना ही माहिती देण्यासाठी ही पोस्ट आहे, अनपेक्षित परिस्थितीमुळे आमच्या बँड फरहान लाईव्हला त्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करावा लागला आहे. 

येत्या वीकेंडला आम्ही सिडनी आणि मेलबर्नला जाऊ शकणार नाही. या गोष्टीमुळे मी खरोखर निराश झालो आहे. तथापि, मी लवकरच तुमच्या सुंदर देशात येण्याची आणि तुमच्यासाठी लाईव्ह परफॉर्म करण्यास उत्सुक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT