Farhan Akhtar and shibani dandekar Instagram /@Farhan Akhtar
मनोरंजन

फरहाननं रोमँटिक कॅप्शनसह शेअर केला शिबानीसोबत सुंदर फोटो

फरहान अख्तरने सोशल मिडियावर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) याचे मोठ्या उत्साहात 19 फेब्रुवारी रोजी लग्न पार पडले. हे लग्न मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा पार पडला. अलीकडेच फरहानने सोशल मिडियावर (Social Media) एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिबानी आणि फरहान खळखळून हसताना दिसत आहेत. या फोटोला फरहानने रोमॅंटिक कॅप्शन दिल आहे. तसेच या पोस्टवर (Post) शिबनीने केलेल्या कमेंटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

फरहानने (Farhan Akhtar) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिबानीसह एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला (Photo) कॅप्शन देत लिहिले की,"तु अशीच हसत रहा आणि मी तुला पहात राहील." या पोस्टवर शिबानीने (Shibani Dandekar) लिहिले की "माझ्या आयुष्यात प्रेम आणि हास्य आणल्याबद्दल धन्यवाद, खूप प्रेम" शबानीने लाल रंगाचा क्रोसेट टॉप आणि स्कर्ट तर फरहानने ब्लॅक कोट असा ड्रेस परिधान केला होता.

फरहान आणि शिबानीच्या लग्नसोहळ्यामध्ये अनुशा दांडेकर, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता ह्रतिक रोशन, फरहानची बहिण जोया अख्तर, अमृता अरोरा, जावेद अख्तर आणि शबाना आझमी या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. फरहान आणि शिबानी एकमेकांना 2018 पासून डेट करत होते. फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT