Farhan Akhtar insta/Farhan Akhtar
मनोरंजन

फरहान अख्तरने शिबानीला दिल्या नाविक बनून शुभेच्छा, म्हणाला- तुझ्यासाठी प्रवाहाविरुद्ध...

फरहान अख्तरने त्याची लाइफ पार्टनर शिबानी दांडेकरला वाढदिवसाच्या दिल्या अनोख्या शुभेच्छा

दैनिक गोमन्तक

Shibani Dandekar Birthday: फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे बॉलिवूडमधील फेमस कपल आहेत. दोघेही आपल्या आयुष्याचा कॉलिटी टाइम स्पेंड करत आहेत. दोघेही एकमेकांचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज मॉडेल-अभिनेत्री-गायिका शिबानीचा वाढदिवस आहे. या निमित्त फरहानने इंस्टाग्रामवर वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.

फरहान अख्तरने इन्स्टाग्रामवर स्वतःचा आणि शिबानी दांडेकरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची खास गोष्ट म्हणजे दोघेही बोटीवर उभे राहून पोज देताना दिसत आहेत. फरहान हातात रुडर घेऊन काळा कोट घालून उभा आहे, तर शिबानीही त्याच्या मागे काळ्या कोट पँटमध्ये उभी आहे.

या खास प्रसंगी फोटो शेअर करून फरहान अख्तरने कॅप्शनमध्ये आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. फरहानने लिहिले, 'प्रिय लाइफ पार्टनर, काही दिवस तू चालतेस, काही दिवस नेव्हिगेट करतेस, काही दिवस ब्रेक घेण्यास सांगतेस, हे बघ आणि फक्त श्वास घे. मी तुझ्यासाठी शक्तिशाली प्रवाहांशी लढेन कारण मला माहित आहे की तू माझ्यासाठी असेच काही करशील. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लव्ह यू शिबानी दांडेकर.'

आता फरहानच्या अशा प्रेमळ पोस्टच्या प्रेमात कोण पडणार नाही. आपल्या नवऱ्याने दिलेल्या शुभेच्छांना उत्तर देतांना शिबानी म्हणाली, 'माझ्या जीवन साथीदारावर माझ खुप प्रेम आहे. तुझ्याशिवाय या प्रवासाची कल्पनाही करू शकत नाही. आपण सर्व काही अद्भुत केले आहे. आता मला नेहमी असाच प्रवास करायला शिकव.'

फरहान अख्तरच्या या पोस्टवर शिबानी दांडेकरचेच नाही तर अनेक सेलिब्रिटींचे मन भरून आले. रोनित बोस रॉयने लिहिले 'फरहान अख्तर खूप सुंदर शब्द. शिबानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. खूप प्रेम आणि प्रार्थना'. तर तिथेच अभय देओलने या गोड पोस्टवर लिहिले, 'अव.. हे वाचताना मला थोडा मधुमेह झाला पण फरहान अख्तर बरोबर आहे. शिबानी, तुम्हा दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खाननेही शिबानीचे अभिनंदन केले आणि तू येशील तेव्हा आम्ही सेलिब्रेट करू असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT