National crush Rashmika Mandanna Dainik Gomantak
मनोरंजन

रश्मिका मदांनासाठी चाहत्याने केला तब्बल 900 कि.मी चा प्रवास

आता रश्मिकाला (Rashmika Mandanna) भेटण्यासाठी फॅन 900 किमीचा प्रवास करून तिच्या घरी पोहोचला होता.

दैनिक गोमन्तक

नॅशनल क्रश (National crush of india) रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) चाहत्यांच्या मनावर राज करते. चाहत्यांना रश्मिकाची प्रत्येक शैली खूप आवडते. रश्मिका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि ती तिच्या चाहत्यांसाठी सुंदर सतत फोटोस शेअर करत असते. चाहत्यांना तिचे फोटोस फार आवडतात. आता रश्मिकाला भेटण्यासाठी फॅन 900 किमीचा प्रवास करून तिच्या घरी पोहोचला होता. याबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितले आहे.रश्मिकाला भेटायला त्यांचा चाहता त्यांच्या कर्नाटकच्या घरी पोहोचला परंतु चित्रपटाच्या शूटिंगमुळे सध्या कर्नाटकात नसल्यामुळे तो आपल्या आवडत्या अभिनेत्रीला भेटू शकला नाही. हे समजल्यानंतर रश्मिका भावनिक झाली आणि तिने ट्विट (Twitter) करुन याबद्दल सांगितले.(Fan reached her house after traveling 900 km to meet national crush Rashmika Mandanna)

रश्मिकाने ट्विट केले- मित्रांनो, मला हे समजले आहे की तुमच्यातील कोणीतरी मला भेटायला खूप दुरून आलं होतं. कृपया असं काहीही करु नका. मला वाईट वाटते की मी तुम्हाला भेटू शकत नाही. मला आशा आहे की एक दिवस मी तुम्हाला तुला भेटेल पण तोपर्यंत तुम्ही मला इथे प्रेम दाखवा. मला खूप आनंद होईल. असे रश्मिकाने ट्विट केलं आहे. रिपोर्ट्सनुसार रश्मिकाच्या चाहत्याचे नाव त्रिपाठी आहे. ते तेलंगणाहून (Telangana) कर्नाटकातील कोडागु रश्मिकाला भेट देण्यासाठी गेले होते. त्याने गूगल वरून रश्मिकाचा पत्ता काढला आणि स्थानिक लोकांना अभिनेत्रीचा पत्ता विचारला. रश्मिकाच्या घराच्या भागात राहणाऱ्या लोकांनी त्वरित पोलिसांना कळविले आणि त्यांना परत पाठविण्यात आले आहे.

साउथच्या (South) मैदानात उतरल्यानंतर रश्मिका आता बॉलिवूडमध्ये (Bollywood) पाऊल ठेवणार आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासमोर मिशन मजनूमध्ये (Mission Majnu) दिसणार आहे. रश्मिकानेही या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याबाबत पोस्ट शेअर केली आहे. आजकाल ती तिच्या दुसऱ्या बॉलीवूड चित्रपटाच्या 'गुडबाय' (Goodbye) या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गुड बायचे दिग्दर्शन विकास बहल करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT