मनोरंजन

Akanksha Dubey Suicide : प्रसिद्ध भोजपूरी अभिनेत्रीने हॉटेलमध्ये केली आत्महत्या...इंडस्ट्रीला मोठा धक्का

प्रसिद्ध भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Rahul sadolikar

भोजपूरी इंडस्ट्रीमधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केली आहे. या घटनेने मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे.

काल रात्री (25 मार्च) आकांक्षा शूटिंगनंतर हॉटेलमध्ये गेली आणि तिथे आत्महत्या केली. त्यामुळे भोजपूरी चित्रपटसृष्टीवर दुख:ची छाया पसरली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलीवूड आणि आता भोजपुरी सिनेमांपर्यंत सेलिब्रिटींचा मृत्यू झाला आहे.

अलीकडेच बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन आणि अलीकडेच अभिनेत्री नीलू कोहलीच्या पतीच्या निधनाने त्याचबरोबर दिग्दर्शक प्रदीप सरकार यांच्या निधनाच्या बातम्यांनी इंडस्ट्रीला आधीच मोठा सर्वांनाच धक्का बसला होता त्यानंतर आता ही घटना घडली आहे.. 

एकापाठोपाठ एक असे धक्के बसत असतानाही लोक या धक्क्यातून सावरले नाहीत की आता आकांक्षा दुबेच्या अचानक आत्महत्येच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

बनारसमधील सारनाथ हॉटेलमध्ये २५ वर्षीय आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. बनारसमध्येच ती तिच्या एका प्रोजेक्टचे शूटिंग करत होती. आकांक्षा दुबेच्या या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही  

हॉटेलमध्ये गेल्यावर अचानक असे काय झाले की आकांक्षाने आत्महत्येसारखे पाऊल उचलले? असे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी उर्वरित माहितीची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आकांक्षा दुबेचा जन्म 1997 मध्ये उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झाला. 2019 मध्ये 'मेरी जंग मेरा फैसला' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यात त्याची छोटीशी भूमिका होती. ही भूमिका छोटी असली तरी आकांक्षा त्यात रमली होती. यानंतर आकांक्षाने 'मुझसे शादी करोगी' आणि 'साजन' सारखे चित्रपट केले, जे हिट ठरले. 

आकांक्षा दुबेला नृत्य आणि अभिनयाची खूप आवड होती. ती टिकटॉकपासून इंस्टाग्रामपर्यंत अॅक्टिव्ह होती. आकांक्षा दुबे अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ आणि रील इन्स्टाग्रामवर शेअर करत असे. आत्महत्येच्या एक दिवस आधी आकांक्षा दुबेने तिचा एक रील इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT