Fukrey 3 Movie | Varun Sharma | Fukrey 3 movie Latest News Insta/@fukravarun
मनोरंजन

'Fukrey 3' चा पुन्हा कॉमेडी धमाका; चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात

अभिनेता वरुण शर्माने आज त्याच्या सोशल मीडियावर 'फुकरे 3' चा तिसरा भाग प्रदर्शित होत असल्याची घोषणा केली

दैनिक गोमन्तक

' फुकरे' (Fukrey) हा एक असा चित्रपट आहे जो आजही लोकांच्या मनात अजूनही घर करून आहे. त्या चुचाचे (Varun Sharma) स्वप्न पाहणे, पुलकित सम्राटच्या स्वप्नातील (Pulkit Samrat) आकडे काढणे आणि नंतर ते जोडणे आणि बाकीचे त्या स्वप्नाकडे पूर्ण खात्रीनिशी पाहणार आणि नंतर ते जिंकणार. जिंकल्यावर एका केसमध्ये अडकणे आणि मग तिथून बाहेर पडणे. हे सर्व कथेचे सर्वोत्तम भाग आहेत जे कधीही सिनेरसिक विसरणार नाही. या चित्रपटाचे दोन भाग बनवण्यात आले आहेत पण आता निर्मात्यांनी तिसर्‍या भागाची तयारी सुरू केली असून या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाल्याची बातमी समोर येत आहे. (Fukrey 3 movie Latest News)

'फुकरे 3'चे शूटिंग सुरू

फुकरे रिटर्न्स ला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, निर्माता रितेश सिधवानीने त्याच्या सोशल मीडियावर 'फुकरे 3' चा तिसरा भाग लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत. अभिनेता वरुण शर्माने आज त्याच्या सोशल मीडियावर 'फुकरे 3' चा तिसरा भाग प्रदर्शित होत असल्याची घोषणा करत लिहिले, 'शुरु हो गई!!!' असे कॅप्शन देत पोस्ट केली आहे. ही घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये आणि विशेषत: 'फुकरे' चाहत्यांमध्ये एक उत्साह दिसून येत आहे.

हा लोकप्रिय चित्रपट फ्रँचायझीला भारतीय सिनेमाच्या कल्ट क्लासिक्सपैकी एक मानले जाते जो प्रेक्षकांना हसण्याचा एक चांगला अनुभव देणारा जबरदस्त आणि हिट चित्रपट ठरला आहे. फुक्रे 3 स्टार्स पुलकित सम्राट, अली फजल, वरुण शर्मा, रिचा चढ्ढा, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी यांनी उत्तम अभिनय केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा यांनी केले आणि एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी निर्मिती केली आहे.

पुन्हा एकदा कॉमेडीची लाट येणार

या चित्रपटाच नाव जरी काढलं तरी चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता बगायला मिळते. आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग तयार होत असल्याने लोक त्याच्या रिलीजची वाट पहायला लागतील. तरुण पिढी जुगाराच्या आहारी जाऊन तिथून बाहेर पडण्याचा प्रवास या चित्रपटातील कथेमध्ये दाखवण्यात आला आहे. पण या सगळ्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या चित्रपटात सर्व कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. जो आजही लोकांना आवडतो. विशेषतः वरुण शर्मा (चूचा) चे पात्र लोकांच्या मनात घर करून आहे. लोक त्या व्यक्तिरेखेपासून त्यांचे लक्ष हटवू शकत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व कलाकारांच्या दमदार अभिनयाने एक उत्तम कथाही लवकरच थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT