Gadar 2  Dainik Gomantak
मनोरंजन

Esha Deol On Gadar 2: सनी देओलच्या 'गदर 2' चा ट्रेलर शेअर करत ईशा म्हणाली...

Esha Deol On Gadar 2: त्यामुळे कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमन्तक

Esha Deol On Gadar 2: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास हजर राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून गदर2 या त्याच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. चाहत्यांपासून ते दिग्गज कलाकारांपर्यत सर्वांनी सनी देओलला त्याच्या या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आता यामध्ये भर पडली आहे सनी देओलची बहिण आणि हेमा मालिनीची मुलगी ईशाची देओलची. ईशाने गदर 2 चा ट्रेलर शेअर करत आपल्या भावाला म्हणजेच सनी देओलला त्याच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर गदर 2 चा ट्रेलर शेअर करत सनी देओलला शुभेच्छा दिल्या आहेत आणि हार्टची इमोजीसह सनी देओलला टॅग केले आहे.

करण देओलच्या लग्नात ईशा आणि हेमामालिनी यांची अनुपस्थिती

गेल्या काही दिवसांपूर्वी सनी देओलचा मुलगा करणचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. मात्र करणच्या लग्नात ईशा आणि हेमा दिसल्या नाहीत त्यामुळे बरीच चर्चा रंगली होती. ईशाने लग्नानंतर करणचे अभिनंदन करणारी पोस्ट केली होती.

ईशा देओल ही धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांची मुलगी आहे आणि तिची दुसरी बहीण आहाना आहे. दुसरीकडे, धर्मेंद्रला त्याच्या पहिल्या लग्नापासून चार मुले आहेत, ज्यामध्ये सनी देओल बॉबी देओल व्यतिरिक्त, मुली विजेत्या आणि विजेत्या आहेत.

दरम्यान, 'गदर2' मध्ये सनी देओलसोबत अमिषा पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 22 वर्षापूर्वी आलेल्या गदरने बॉक्स ऑफीसवर मोठा धुमाकुळ घातला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रेम दिले होते.

काही दिवसांपूर्वी 'गदर 2' च्या रिलिज झालेल्या ट्रेलरचेदेखील कौतुक होताना दिसत आहे. 'उड जा काले कावा' या गाण्याचा रिमेक रिलिज झाला असून सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

आता 11 ऑगस्टला चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. महत्वाचे म्हणजे, अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड 2' हा चित्रपटदेखील याचदिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सनी देओल आणि अमिषा पटेलच्या अभिनयाची जादू पुन्हा चालणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT