Mother's Day Dainik Gomantak
मनोरंजन

Mother's Day: मेरे पास मां है...! 'आई'च्या भूमिकेने बॉलिवूडमध्ये कधी केला प्रवेश?

सलीम-जावेद आणि मनमोहन देसाई यांच्या चित्रपटातील दुःखी आई पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये दिसू लागली आहे.

दैनिक गोमन्तक

यशचा KGF Chapter 2 मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटातील प्रत्येक डायलॉग आणि अ‍ॅक्शन सीन चर्चेत आहे. या चित्रपटात दाखवलेले दुःखी आई आणि मुलाचे नाते लोकांना फार आवडले. या नात्यामुळे राजा कृष्णप्पा बैरिया संपूर्ण जगाचा 'रॉकी भाई' बनतो. सर्वात जास्त सोने गोळा करतो. (entry of mother in Bollywood)

पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे एखाद्या चित्रपटात आईला दुःखी दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. वास्तविक, सलीम-जावेद आणि मनमोहन देसाई यांच्या चित्रपटातील दुःखी आई पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये दिसू लागली आहे.

आईने बॉलिवूडमध्ये कधी प्रवेश केला?

चित्रपटांमधील आईच्या भूमिकेकडे पाहिले तर राखी गुलजारचे नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येते. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या राकेश रोशनच्या चित्रपटात ती 'मेरे करण-अर्जुन आएंगे' असे ओरडत होती. घड्याळाचे काटे थोडे मागे फिरवले तर निरुपा रॉय यांचे नाव लक्षात येईल. 1975 च्या 'दीवार' मध्ये, ज्यांच्याबद्दल 'मेरे पास मां है' हा आयकॉनिक डायलॉग लिहिला गेला. पण या दोघींच्या पलीकडे जाऊन भारतीय चित्रपटसृष्टीच्या पहिल्या आईबद्दल बोलायचे झाले तर लीला चिटणीसचे नाव समोर येते, तीने अशा व्यक्तिरेखा साकारायला सुरुवात केली. आवारा (1951) मध्ये ती राज कपूरची आई बनली आणि गंगा जमना (1961) मध्ये दिलीप कुमारच्या आईची भूमिका केली. त्याच वेळी, गाइड (1965) मध्ये तीने देव आनंदच्या आईची भूमिका साकारली होती.

मेरे पास मां है...

1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दीवार' मधील 'मेरे पास मां है' हा डायलॉग आज पर्यंत लोकांना लक्षात आहे. चित्रपटाच्या एका दृश्यात, अमिताभ जेव्हा आपला धाकटा भाऊ शशी कपूरला बंगला आणि पैशाची श्रीमंती दाखवतो, तेव्हा शशी कपूर म्हणतो, "मेरे पास माँ है... हा चित्रपट जसा सुपरहिट झाला, तसाच त्याचा संवादही अजरामर झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT