Neeraj Chopra Biopic

 
Instagram /@neeraj____chopra
मनोरंजन

मी त्याच्यापासून प्रेरित; नीरज चोप्राच्या बायोपिकमध्ये आयुष्मान खुरानाला करायच काम

मी वास्तविक जीवनातील नायकांपासून प्रेरित आहे, जे आश्चर्यकारक कामगिरी करतात. सध्या मी नीरज चोप्रा आणि..

दैनिक गोमन्तक

आयुष्मान खुराना हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. आयुष्मानने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्टिरियोटाइप मोडणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या आयुष्मान खुरानाला आता सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राची भूमिका करायची आहे. खुद्द आयुष्मानने याबाबत सांगितले आहे. आयुष्मानला साकारण्याची इच्छा असलेल्या नीरजच्या भूमिकेबद्दल बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला, “मी वास्तविक जीवनातील नायकांपासून प्रेरित आहे, जे आश्चर्यकारक कामगिरी करतात. सध्या मी नीरज चोप्रा आणि त्याने जगाच्या पाठीवर देशाचे जे काही नाव कमावले आहे, त्यामुळे आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

आयुष्मान खुरानाने सांगितले की, जर नीरजचा बायोपिक (Biopic) बनत असेल आणि त्याला स्वतःला त्यात काम करायला आवडत नसेल तर आयुष्मानला त्यात काम करायला आवडेल. तो म्हणाला, ऑलिम्पिकमध्ये (Olympics) त्याने शौर्य दाखवले आहे. त्यामुळे त्याच्या बायोपिकमध्ये काम करायला मला नक्कीच आवडेल, जर तो कधी बनला आणि त्यात नीरजने त्याची भूमिका केली नाही. तर त्याची भूमिका मी करेल.

नीरजचा आवडता अभिनेता कोणता?

यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. या विजयाचा जल्लोष देशभरात साजरा करण्यात आला. बायोपिकबद्दल बोलताना नीरज चोप्रा यांनी 2018 साली झालेल्या आशियाई खेळांदरम्यान याबद्दल सांगितले. तो म्हणाला होता की जर त्याचा बायोपिक बनवला गेला तर त्याला अक्षय कुमार किंवा रणदीप हुड्डा यांना भूमिकेत बघायच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT