Neetu kapoor and Rushi Kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

Wedding Anniversary निमित्त नीतू कपूरने शेअर केली भावुक पोस्ट

लग्नाचा वाढदिवसानिमित्त (Wedding Anniversary) नीतू कपुरने ऋषी कपूरच्या आठवणीत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

ऋषी कपूर आता या जगात नाहीत, पण त्यांचे चाहते त्यांच्या चित्रपटामधून त्यांची आठवण जिवंत ठेवत आहेत. त्यांची पत्नी नीतू कपूर (Neetu kapoor) सोशल मीडियावर ऋषीसंबंधित फोटो (Photo) आणि व्हिडीओ (Video) शेअर करत असते. आज त्याच्या लग्नाचा वाढदिवसानिमित्त (Wedding Anniversary) नीतू कपुरने ऋषी कपूरच्या आठवणीत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो मध्ये ते दोघे "द कपिल शर्मा" शोमधला आहे.

नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोखाली त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले -आठवणींमध्ये. पुढे त्यांनी हृदयाची इमोजी बनवली आहे. या फोटोवर अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. तर ऋषी कपूर यांचे चाहते लिहतात, आम्ही त्यांची आठवण करतो, जागार्तील सर्वात सुंदर जोडपे , तुम्ही दोघे आमच्या हृदयात राहता अशा विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कपिलच्या शोमध्ये नीतू कपूर यांनी सांगितले की, ऋषी कपूर यांनी पॅरिसमधून त्यांना पत्र लिहून आपले मन व्यक्त केले होते. त्यावेळी त्या श्रीनगरमध्ये 'कभी कभी' चे शुटींग करत होत्या. ऋषी आणि नीतू यांचे लग्न 1980 मध्ये झाले. त्यांना रणबीर (Ranbir kapoor ) आणि रिद्धिमा हि दोन मुले आहेत. रणबीरने आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात करिअर केले, तर रिद्धिमा ज्वेलरी डिझायनर क्षेत्रात आपले करिअर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT