Emmy Awards Dainik Gomantak
मनोरंजन

Emmy Awards 2022: भारतात होणार Live स्ट्रीमिंग, केव्हा अन् कुठे पाहणार जाणून घ्या

Emmy Awards: 75 व्या एमी पुरस्कारांची घोषणा मंगळवारी होणार आहे. दरवर्षी या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबाबत उत्सुकता असते.

दैनिक गोमन्तक

Emmy Awards 2022: 75 व्या एमी पुरस्कारांची घोषणा मंगळवारी होणार आहे. दरवर्षी या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबाबत उत्सुकता असते. इंग्रजी भाषेतील टीव्ही आणि वेब कॉन्टेंटसाठी एमी अवॉर्ड्स हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. एमी पुरस्कार अकादमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेस द्वारे हा पुरस्कार दिला जातो, ज्याला टेलिव्हिजन अकादमी असेही म्हणतात. सोमवारी रात्री 8 ते 11 या वेळेत हा पुरस्कार जाहीर होणार आहे. याचा अर्थ भारतीय वेळेनुसार तो मंगळवारी पहाटे सुरु होईल. यावेळी भारतात ते स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर लाईव्ह दाखवले जाईल.

लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पहायचे ते जाणून घ्या

तुम्हाला हा पुरस्कार लाइव्ह पाहायचा असेल, तर तुम्हाला तो कधी आणि कुठे पाहता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 5.30 वाजता एमी अवॉर्ड्स सोहळा सुरु होईल, आणि सकाळी 8.30 वाजता हा पुरस्कार सोहळा पार पडेल. यूएस (USA) मध्ये, हा पुरस्कार NBC वर प्रसारित केला जाईल, तर भारतात (India) तो Lionsgate Play वर प्रसारित केला जाईल. सॅटर्डे नाईट लाइव्हचे केनन थॉम्पसन या कार्यक्रमाचे आयोजन करतील.

जुलैमध्ये नॉमिनेशन जाहीर झाले

12 जुलै रोजी नॉमिनेशन जाहीर करण्यात आले आहे. 'सक्सेशन' या ड्रामा सीरीजला सर्वाधिक 25 कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले आहे. याशिवाय 'स्क्विड गेम' या कोरियन ड्रामा सीरीजला 13 नामांकने मिळाली आहेत. ऍपल टीव्ही प्लस शो 'टेड लॅसो' आणि एचबीओच्या 'द व्हाईट लोटस' शोला प्रत्येकी 20 नामांकन मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT