Elon Musk Dainik Gomantak
मनोरंजन

50 व्या वर्षी इलॉन मस्क बनले 7 व्या मुलाचे वडील

जगभरात ओळखले जाणारे अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क वयाच्या 50 व्या वर्षी 7 व्या अपत्याचे वडील झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

जगभरात ओळखले जाणारे अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क (Elon Musk) वयाच्या 50 व्या वर्षी 7 व्या अपत्याचे वडील झाले आहेत. त्याची दुसरी पत्नी ग्रिम्स दुस-यांदा आई झाली असून, ग्रिम्स एक लोकप्रिय हॉलीवूड गायिका आहे. असे वृत्त आहे की डिसेंबर 2021 मध्ये, ग्रिम्स सरोगसीद्वारे दुसऱ्यांदा मुलीची आई बनली, परंतु दोघांनीही ही गोष्ट लपवून ठेवली होती, सध्या त्यांनी ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. (Elon Musk became the father of a 7th child at the age of 50)

इलॉन मस्कने मुलीचे नाव खूप विचित्र ठेवले आहे,

डिसेंबरमध्ये जन्मलेल्या मुलीचे नाव देखील या जोडप्याने उघड केले. इलॉन मस्क आणि ग्रिम्स यांनी त्यांच्या मुलीचे नाव एक्सा डार्क सिडरेल असे ठेवले आहे. हे नाव उच्चारायलाही अवघड आहे आणि ते खूप वेगळेही आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला हे नाव उच्चारण्यात अडचण येत असेल, तर अ‍ॅलनने मुलीचे टोपणनाव देखील ठेवले आहे जे Y असं आहे. तर जोडप्याने मुलीच्या नावाचा अर्थ देखील सांगितला आहे, ज्यानुसार Sideræl चा उच्चार 'sigh-deer-ee-el' असा होतो, पृथ्वीपेक्षा वेगळा असलेला विश्वाचा अचूक काळ असा त्या नावाचा अर्थ आहे. तर या नावात Exa Dark चा अर्थ आहे, Exa म्हणजे सुपर कॉम्प्युटिंग टर्म exaFLOPS आणि डार्क म्हणजे 'अज्ञात' असा होतो.

ग्रिम्सने 2 वर्षांच्या मुलीच्या आधी मुलाला जन्म दिला आहे. त्याचं नावही खूप विचित्र आहे. ग्रिम्स आणि अ‍ॅलन यांनी त्यांच्या मुलाचे नाव X A-12 ठेवले आहे, आता तुम्ही त्याला कसे म्हणता ते आम्ही तुमच्यावरती सोडून देऊयात.

अ‍ॅलन

सातव्यांदा बाप झालेला फादर अ‍ॅलन आता सातव्यांदा बाप झाला आहे. पहिली पत्नी जस्टिन विल्सनपासून त्याला 5 मुले आहेत, त्यांची नावे आहेत झेवियर मस्क, ग्रिफिन मस्क, काई मस्क, सॅक्सन मस्क आणि डॅमियन मस्क, त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT