Ekta Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

पुन्हा 'लव्ह सेक्स धोका', 'या' दिवशी मोठ्या पडद्यावर झळकणार एकता कपूरचा 'LSD 2'

LSD2: आजच्या डिजिटलच्या युगात प्रेमाचे बदलते स्वरुप, फसवणूक आणि त्याचे परिणाम त्यातील गुंतागुतींवर यावर बेतलेले हे कथानक असणार आहे.

दैनिक गोमन्तक

LSD2: एकता कपूर ही आपल्या वेगळेपण असणाऱ्या मालिका आणि चित्रपटांसाठी ओळखली जाते. आता ती लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी 'लव्ह, सेक्स और धोका 2' हा चित्रपट घेऊन येणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने चित्रपटाची घोषणा केली होती.

आता निर्मात्यांनी 19 एप्रिल 2024 ही चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. यासोबतच त्यांनी एक मोशन पोस्टरही रिलीज केले आहे.

लव्ह, सेक्स और धोखा' 2010 साली रिलीज झाला होता. या सिनेमातून राजकुमार रावने डेब्यू केले होते. आता 14 वर्षांनंतर त्याचा दुसरा भाग रुपेरी पडद्यावर येत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन मोशन पोस्टरमध्ये त्याच्या अनोख्या दुनियेची झलक दाखवली आहे. यात हृदयाच्या आकारात धडधडणारे सोशल मीडिया ॲप्स आयकॉन असलेले हृदय आहे, जे डिजिटल युगातील चित्रपटाच्या प्रेमाची थीम असल्याचे पाहायला मिळते.

हे मोशन पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी एक कॅप्शनदेखील लिहले आहे- 'यह व्हॅलेंटाइन डे नहीं आसान, बस इतना समझ लीजीए, लव्ह,सेक्स और धोका का दरियाँ है और डूब जाना है'

आजच्या डिजिटलच्या युगात प्रेमाचे बदलते स्वरुप, फसवणूक आणि त्याचे परिणाम त्यातील गुंतागुतींवर यावर बेतलेले हे कथानक असणार आहे.

लव्ह सेक्स और धोखा 2' बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड आणि कल्ट मूव्हीज प्रस्तुत आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता आर कपूर आणि शोभा कपूर यांनी केली असून दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित आहेत. आता एकता कपूरचा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे महत्वाचा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT