Ekta Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Ekta Kapoor च्या अडचणीमध्ये वाढ; न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

Arrest Warrant Against Ekta Kapoor: निर्माती एकता कपूर तिची वेब सीरिज XXX सीझन 2 मुळे अडचणीत सापडली आहे

दैनिक गोमन्तक

निर्माती एकता कपूर तिची वेब सीरिज XXX सीझन 2 मुळे अडचणीत सापडली आहे. बेगुसराय कोर्टाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. या सिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह दृश्यांबाबत गेल्या वर्षी बिहारच्या बेगुसराय न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी आता न्यायालयाने एकता आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे.

या वेब सीरिजमध्ये सैनिकाच्या पत्नीची अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली होती. ज्यासाठी एकता कपूरवर (Ekta Kapoor) गेल्या वर्षी बिहारच्या बेगुसरायमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकतावर आरोप होता की तिने वेब सीरिजमध्ये सैनिक आणि त्यांच्या पत्नींना चुकीच्या पद्धतीने दर्शवले आहे. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी बेगुसराय कोर्टाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांना समन्स पाठवून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंभूकुमार यांनी वर्षभरापूर्वी हा गुन्हा दाखल केला होता. शंभू कुमारने सांगितले की, या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या सीनमुळे ते खूप दुखावले आहेत. भारतीय सैनिक स्वतःला धोक्यात घालून देशाची सेवा करतात. त्यांच्याकडे आदराने पाहिले पाहिजे, पण इथे उलटेच घडत आहे. वेब सिरीजमध्ये भारतीय जवान आणि त्याच्या पत्नीला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

एकता कपूरने या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. एकता कपूरने सांगितले की, तिला या प्रकरणाची माहिती मिळताच तिने या वेब सीरिजमधून हा सीन काढून टाकला होता. यासोबतच एकताने आपली चूक मान्य केली असून लोकांची माफीही मागितली आहे. आता न्यायालयाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट जारी झाल्यानंतर एकता कपूर शोभा कपूरच्या अडचणीत वाढ झाली आहे. अधिवक्ता हृषिकेश पाठक यांनी सांगितले की, 524/C 2020 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. XXX वेब सिरीज Alt Balaji वर प्रवाहित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT