taapsee pannu and Shah Rukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

किंग खानसोबत काम करण्यासाठी तापसीला करावी लागली 10 वर्ष तपश्चर्या

तापसी पन्नू किंग खानसोबत 'डंकी' (Dunki) चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करतांना दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवुडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूचे मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. ते स्वप्न म्हणजे शाहरुख खानसोबत काम करण्याचे होय. शाहरुख खानसोबत काम करणे हे अनेक कलाकारांचे स्वप्न असते आणि तापसीचे हे स्वप्न साकार झाले आहे. कारण ती किंग खानसोबत 'डंकी' (Dunki) चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट राजकुमार हिरानी दिग्दर्शित करणार आहेत. राजकुमार हिरानी हे बॉलिवूडमधील एक दिग्गज चित्रपट निर्माते आहेत. या चित्रपटाद्वारे तापसीला (Taapsee Pannu) दोन मोठ्या दिग्गजांसह काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे तापसी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. (Taapsee pannu Latest News)

* तापसीला करावी लागली 10 वर्ष तपस्या

तापसीने ट्विट (twitter) करत हा आनंद व्यक्त केला आहे. तिने लिहिले, इथपर्यंत पोहोचणे खूप कठीण होते. पण एका सुपरस्टारने म्हटले आहे की, जर तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल, तर ती घडवून आणण्यासाठी संपूर्ण विश्व तुम्हाला घेऊन जाते. प्रामाणिकपणा, मेहनत आणि समर्पणामुळे सर्व काही शक्य आहे. यास सुमारे 10 वर्षे लागली.

शाहरुखने सोशल मीडियावर आपल्या डंकी या नव्या चित्रपटाची घोषणा (Instagram) वर पोस्ट शेअर करत केली आहे. शाहरुख एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो राजकुमार हिरानी यांच्याशी चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे. शाहरुखने लिहिले- प्रिय राजकुमार हिरानी सर, तुम्ही माझे सांताक्लॉज आहात. तुम्ही सुरुवात करा मी वेळेवर पोहोचेन. मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. मी 22 डिसेंबर 2023 रोजी तुम्हा सर्वांसाठी डंकी घेऊन येत आहे.

* डंकी शूटिंग कधी सुरू होईल

येत्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाचे शूटिंग पंजाबमध्ये होणार आहे. या चित्रपटाचे लेखन अभिजात जोशी, कनिका ढिल्लन आणि हिरानी यांनी केले आहे. हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT