Drew Barrymore dances with Lilly Singh  Instagram
मनोरंजन

Video: अक्षय कुमारच्या 'चुरा के दिल मेरा' गाण्यावर थीरकल्या 'या' हॉलीवुड अभिनेत्री

हॉलिवूड अभिनेत्री ड्र्यू बॅरीमोर बॉलीवुड गाण्यावर लिली सिंहसह थीरकल्या.

दैनिक गोमन्तक

हॉलिवूड अभिनेत्री ड्र्यू बॅरीमोर आणि यूट्यूबर लिली सिंग यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी या दोघांच्या प्रसिद्ध "चुरके दिल मेरा" या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. खरी गंमत म्हणजे ड्रू परफेक्ट लिपसिंक करतांना दिसत आहे. या व्हिडिओवर अक्षय कुमारने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

कॅनेडाची यूट्यूबर लिली सिंग हॉलिवूड अभिनेत्री ड्र्यू बॅरीमोरला भेटली तेव्हा त्यांनी खूप मस्ती केली. या दोघीनी बॉलिवूडच्या (Bollywood) सुपरहिट गाण्यावर 'चुरा के दिल मेरा'वर धमाल डान्स केला. लिली ड्रू बॅरीमोरच्या शोमध्ये पाहुणी म्हणून पोहोचली होती. लिलीने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. तिने लिहिले, "शेवटी ड्र्यू बॅरीमोरला भेटले आणि तिने माझे हृदय चोरले."

लिली सिंग शाहरुख खानच्या हुक स्टेपने डान्स सुरू करत असल्याचे व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे. 'चुरा के दिल मेरा'चे हुक स्टेपही दोघे करतात. यानंतर, ड्रू थोडे या गाण्यांचे लिपसिंक करतांना दिसत आहे.

* अक्षय कुमारनेही केले कौतुक

लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. बॉलीवुडमधील खिलाडी अक्षय कुमारनेही त्यांच्या डान्सचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर फ्रीडा पिंटोनेही कौतुक केले आहे. मोटिव्हेशन स्पीकर जय शेट्टी यांनी ड्रूच्या लिपसिंकचे कौतुक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT