Karan Vohra Dainik Gomantak
मनोरंजन

Karan Vohra: डबल सेलिब्रेशन ! 'इमली' फेम अभिनेत्याच्या घरी दोन चिमूकल्यांचं आगमन..

Karan Vohra: 'जिंदगी की महक' आणि 'कृष्णा चली लंदन' सारख्या मालिकेतून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Karan Vohra: टीव्ही अॅक्टर करण वोहराने आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. करणच्या घरी दोन जुळ्या मुलांचे आगमन झाले आहे. सध्या करण 'इमली' या मालिकेमुळे चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वीच करण आणि त्याची पत्नी बेला दोन जुळ्या मुलांचे आई-वडील बनले आहेत. ही आनंदाची बातमी करणने खास अंदाजात चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. सोशल मिडियावर आपल्या पत्नीसोबतचा फोटो पोस्ट करत करणने ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याला ओम नम: शिवाय असा कॅप्शन त्याने दिला आहे.

एका मुलाखतीत करणने म्हटले आहे की, आम्हाला जुळ्या मुलांचा आशिर्वाद मिळाला आहे. मी जेव्हा मुंबईत होतो, तेव्हा माझ्या पत्नीने आनंदाची बातमी मला सांगितली होती. त्यानंतर आठवड्यानंतरच मला इमली प्रोजेक्ट मिळाला. त्यामुळे माझे पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य आनंदाने भरले आहे.

माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षण होता. त्याने शेअर केलेल्या बातमीनंतर त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, नवीन प्रवासासाठी शुभेच्छा, करण! दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, दोघांना खूप शुभेच्छा, आणि बाळांना आशिर्वाद.

करण सध्या स्टार प्लसवरील इमली या मालिकेत अर्थवाच्या भूमिकेत दिसत आहे. याआधी 'जिंदगी की महक' आणि 'कृष्णा चली लंदन' सारख्या मालिकेतून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT