Shoorveer  Twitter
मनोरंजन

Shoorveer: देशसेवेच्या 'अग्निपथा'वर चालणार Disney+Hotstarचे 'शूरवीर'

शूरवीरच्या टीझरमध्ये तुम्हाला तिन्ही सैन्यातील सर्वोत्कृष्ट सेना एकत्र काम करतांना दिसणार

दैनिक गोमन्तक

भारतीय सैन्यात तरुणांच्या भरतीसाठी केंद्र सरकारच्या (Government) अग्निपथ या नव्या योजनेची सध्या देशात जोरदार चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत डिज्नी प्लस हॉटस्टारने सर्वोच्च संरक्षण दलांवर आधारित शूरवीर (Shoorveer) या नवीन शोची घोषणा केली आहे. समर खान निर्मित आणि कनिष्क वर्मा दिग्दर्शित हा एक अॅक्शन ड्रामा आहे. हा शो Disney+ Hotstar वर हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषेत उपलब्ध असेल.

भारतीय लष्कराच्या गणवेशाने तरुणांना नेहमीच प्रभावित केले आहे. शूरवीरच्या टीझरमध्ये तुम्हाला तिन्ही सैन्यातील सर्वोत्कृष्ट सेना एकत्र दिसणार आहे. सैन्यातील शूर जवान कसे एकत्र येऊन देशाला संकटातून वाचवतात. गुप्त कारवाया, प्रखर लष्करी प्रशिक्षण, हवाई युद्ध आणि गुप्तचर हेराफेरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे सैनिकांमधील मानवी नातेसंबंध या वेधक कथेत दाखवले जातील. समर खान निर्मित आणि कनिष्क वर्मा दिग्दर्शित जुगरनॉट प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे.

मकरंग देशपांडे यांनी हा चित्रपट करण्यामागचे कारण सांगितले

अभिनेते मकरंद देशपांडे यांनी शूरवीरबद्दल सांगितले की, चित्रपटाची कथा इतकी दमदार आहे की मला या कथेत काम करायची आवड निर्माण झाली. मनीष चौधरी आणि माझे पात्र या संघाला भारतातील सर्वोत्कृष्ट संरक्षण दल बनवणे आणि त्यांना आमच्या संरक्षणाची पहिली फळी म्हणून ठेवणे आहे.

शूरवीरची स्टारकास्ट

शूरवीर'मध्ये मकरंद देशपांडे, मनीष चौधरी, रेजिना कॅसांड्रा, अरमान रल्हन, आदिल खान, अभिषेक साहा, अंजली बारोट, कुलदीप सरीन, आरिफ झकेरिया, फैसल रशीद, साहिल मेहता आणि इतर अनेक स्टार्स दिसणार आहेत. या शोमध्ये शिव्या पठाणीसारख्या कलाकारांचा देखील समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT