Disha Vakani Dainik Gomantak
मनोरंजन

Disha Vakani: तब्बल ६ वर्षानंतर दयाबेन कॅमेरासमोर

Disha Vakani: ती ना अभिनयाच्या दुनियेत परतली ना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये, मात्र तिचे चाहते तिची वाट पाहताना नेहमीच दिसतात.

दैनिक गोमन्तक

Disha Vakani: तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्यातील दयाबेनचे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानीचा मोठा चाहतावर्ग आहे.

मालिका सोडल्यानंतर अनेक वर्षांनी दिशा आपल्या कुटुंबासोबत दिसून आली होती. मिळालेल्या माहीतीनुसार, दिशा तिच्या मुलगा आणि पतीसोबत दिसली होती. दिशा आपला पती मयूर पडियासोबत नवरात्री सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा ती पारंपारिक वेशभूषेत दिसून आली.

Disha Vakani

जवळजवळ सहा वर्षानंतर दिशा वाकानी पब्लिकली दिसून आली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मासह दिशा वाकानी 2017 पासून अभिनयापासून दूर असल्याची माहिती आहे. 2017 मध्ये, तिने तिच्या मुलाच्या जन्मानंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोडला.

काही काळानंतर, दिशा वाकानी शोमध्ये परतणार असल्याच्या बातम्या आल्या, परंतु काही कारणांमुळे ती या शोमध्ये परतली नाबी. सध्या दिशा वाकानी तिच्या कौटुंबिक जीवनात व्यस्त आहे. ती ना अभिनयाच्या दुनियेत परतली ना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये, मात्र तिचे चाहते तिची वाट पाहताना नेहमीच दिसतात.

दरम्यान, अलीकडच्या काळात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ज्या कलाकारांमुळे ओळखला जात होता त्यातील अनेक कलाकार शो मधून बाहेर पडले आहेत. असित मोदी यांनी अनेकदा दयाबेन म्हणजेच दिशा शोमध्ये परतणार असल्याचे म्हटले होते मात्र दिशा कोणत्या ना कोणत्या कारणाने शोमध्ये परतली नाही. आता दिशाला अनेक वर्षानंतर पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT