Jhund Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Jhund Movie: ...तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही!

झुंड चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदेची पोस्ट चर्चेत...

दैनिक गोमन्तक

Jhund Movie: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची सामाजिक विषयांमध्ये रुची असल्याने त्यांनी बनवलेले चित्रपट हे समाजातील अशा विषयांवर आधारित असतात जे विषय आजवर हाताळले गेले नाहीत. नुकताच त्यांचा ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत अनेकजण चर्चा करत आहेत. या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. मात्र ‘झुंड’ प्रदर्शित झाल्यावर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांची पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. त्यांनी ट्वीटद्वारे आपले मत व्यक्त केले आहे. (director kedar shinde reaction on jhund movie)

'मराठी असण्याचा अभिमान. तुमच्या पाठीशी तमाम जनता आहे, असे म्हणत त्यांनी नागराज मंजुळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर याबाबतच त्यांनी अजून एक पोस्ट केली आहे, ज्यात लिहिले आहे की, 'जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. म्हणून झुंड हा चित्रपट पाहा.’

‘झुंड’ हा नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा पहिला हिंदी सिनेमा आहे. या चित्रपटाद्वारे नागराज यांनी हिंदी चित्रपटसृृष्टीत पदार्पण केलं आहे. स्लमसॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट गेल्या 4 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT