Brahmastra 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Brahmastra 2: दीपिका रणबीर कपूरची आई! काय आहे हे नवीन गुपीत जाणून घ्या

ब्रह्मास्त्र चित्रपटातील एक सीन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर व आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्र, नुकताच OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ब्रह्मास्त्र रिलीज झाल्यापासून या चित्रपटात दीपिका पदुकोणची चर्चा होत होती. दरम्यान, ब्रह्मास्त्र चित्रपटातील एक सीन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या सीनमध्ये दीपिका चित्रपटातील लहान शिवासोबत दिसत आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपटाचा सिक्वेल देव नावाच्या पात्राभोवती फिरत आहे. यात शिव म्हणजेच रणबीर कपूरचा पिता दाखवण्यात आला आहे. एका सीनमध्ये दीपिकाचा चित्रपटातील व्हिडिओ समोर आला असून, तो चांगलाच व्हायरल होत आहे. दीपिका या चित्रपटात भुमिका करणार की नाही याबाबत संभ्रम होता. दरम्यान, या सीननंतर दीपिकाने चित्रपटात काम केल्याचे स्पष्ट झाले असून, दीपिकाने सीनमध्ये पकडलेल्या बाळाला पाहता ती रणबीर कपूरच्या आईचे पात्र करत असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे.

ब्रह्मास्त्र 2 मध्ये दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरला आई-मुलाच्या रूपात पाहणे चाहत्यांसाठी एक वेगळा अनुभव असेल. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्यात अनेक दिवस जवळीकता होती. दोघांच्या अफेअर बाबत देखील अनेकवेळा चर्चा झाल्या. दीपिका आणि रणबीरने 09 सप्टेंबरला बॉलिवूडमध्ये आपली 15 वर्षे पूर्ण केली आहेत. 2007 मध्ये रणबीरने सावरिया आणि दीपिकाने ओम शांती ओम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT