Diljit Dosanjh Dainik Gomantank
मनोरंजन

Jogi: दिलजीत दोसांझचा फर्स्ट लुक आऊट

दिलजीत दोसांझ उत्तम एक्टर आणि सिंगर आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझ आता बॉलीवुडमध्ये आपला कमाल दाखवत आहे. दिलजीत दोसांझ उत्तम एक्टर आणि सिंगर आहे. त्याने गुड न्युज , सुरमा , उडता पंजाब , फिल्लौरी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता दिलजीत दोसांझचा ' जोगी ' हा नवा चित्रपट (Movie) चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आज लाँच झाले आहे. 'जोगी' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 16 सप्टेंबर रोजी OTT वर रिलीज होणार आहे .

या पोस्टरमध्ये दिलजीत जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात दिलजीतसोबत अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. कुमुद मिश्रा, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अयुब, हितेन तेजवानी आणि परेश रावल देखील या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाचे पोस्टर नेटफ्लिक्सवर शेअर करण्यात आले आहे . या चित्रपटाचे निर्माते अली अब्बास जफर यांनी हे पोस्टर शेअर करत त्यावर ' हिम्मत का नाम जोगी ', ' उम्मेद का नाम जोगी ' असे लिहिले आहे .

हा चित्रपट 1984 च्या दिल्लीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.दंगलीच्या काळात काही मित्रांची हृदयस्पर्शी कथा या चित्रपटात आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना दिलजीत दोसांझ म्हणाला, “जोगीची भूमिका साकारणे हा सर्वात समाधानकारक अनुभव होता. मी नेटफ्लिक्सवर माझ्या डिजिटल पदार्पणाची वाट पाहत आहे. या सुंदर कथेला जिवंत करण्यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. या भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी अली आणि हिमांशूचे आभार मानू इच्छितो."

आता दिलजीत दोसांझचा हा चित्रपट बॅाक्सऑफिसवर किती कमाल दाखवतो , याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे .'जोगी' 16 सप्टेंबर 2022 रोजी 190 हून अधिक देशांमध्ये केवळ नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT