Dhvani Bhanushali Dainik Gomantak
मनोरंजन

Times Square Billboard वर झळकतेय ध्वनी भानुशाली

ध्वनीने आणखी एक यश संपादन केले तिने अलीकडेच टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर तिचा पोस्टर लावलेला फोटो आपल्या इनस्टाग्राम हॅडलवर शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध गायिका ध्वनि भानुशाली (Dhvani Bhanushali) केवळ देशातच नाही तर जगभरात तिच्या आवाजासाठी ओळखली जात आहे. आता ध्वनीने आणखी एक यश संपादन केले तिने अलीकडेच टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर तिचा पोस्टर लावलेला फोटो तिने आपल्या इनस्टाग्राम हॅडलवर शेअर केले आहे. (Dhvani Bhanushali appears on Times Square Billboard)

म्युझिक अॅप Spotify ची इक्वल कॅम्पेन ज्यामध्ये ध्वनि जगभरातील महिला कलाकारांसोबत दिसून येत आहे तसेच ध्वनीची 'आर्टिस्ट ऑफ द मंथ' म्हणून निवड करण्यात आली, ती आता भारतात अभिमानाने ठसा उमटवताना चाहत्यांना दिसून येत आहे. ध्वनी आपल्या रेकॉर्डब्रेक कामामुळे सतत चर्चेत राहिली आहे.

'द क्रॉसरोड्स ऑफ द वर्ल्ड' म्हणून ओळखले जाणारे, न्यूयॉर्कचे टाइम्स स्क्वेअर हे जगातील सर्वात मोठे कमर्शियल इंटरसेक्शन आणि पर्यटकांचे आकर्षण आहे. इतकेच नाही तर हे राखीव ठिकाण आहे, जिथे जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्तींचे प्रोजेक्ट लावले जातात. टाइम्स स्क्वेअर वरील तिचा फोटो शेअर करत ध्वनीने लिहिले, "माझा दिवस पूर्ण बनला... शब्द नाहीत."

ध्वनिच्या शेवटच्या रिलीज झालेल्या 'डायनामाइट' या गाण्याला खूप यश मिळाले. यासोबतच तिच्याकडे प्रसिद्ध गाण्यांचीही कमतरता नाहीये, ज्यात 'वास्ते' सारखे हिट गाणे देखील आहे. या म्युझिक व्हिडिओने 1 अब्ज व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आणि जागतिक स्तरावर सर्वाधिक लाइक केलेल्या टॉप 10 म्युझिक व्हिडिओंच्या यादीत स्थान मिळवले.

अशा प्रकारे YouTube रिवाइंड 2019 मध्ये 'दिलबर', 'लेजा रे', 'इशारे तेरे', 'कॅंडी', 'मेरा यार' आणि 'मेहंदी' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये वैशिष्ट्यीकृत ध्वनि ही एकमेव भारतीय कलाकार आहे जिने एवढी सुंदर गाणी दिली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT