Dhurandhar 2 Dainik Gomantak
मनोरंजन

VIDEO: 'धुरंधर' चा पाकड्यांना धसका? गल्लीबोळ्यामध्ये पोलिस सुरक्षा वाढवली, प्रत्येकाचं आयडी करतायत चेक, पाहा व्हिडिओ

Dhurandhar 2: भारतीय चित्रपटसृष्टीने 'धुरंधर' मालिकेच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर जे प्रहार केले आहेत, त्याचे पडसाद आता शेजारील देशात उमटताना दिसत आहेत.

Sameer Amunekar

भारतीय चित्रपटसृष्टीने 'धुरंधर' मालिकेच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर जे प्रहार केले आहेत, त्याचे पडसाद आता शेजारील देशात उमटताना दिसत आहेत. 'धुरंधर २' रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर काही व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, पाकिस्तानची पोलीस यंत्रणा कराचीच्या लयारी भागात 'भारतीय जासूस' शोधण्यासाठी गल्लोगल्ली फिरत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्यांमागील सत्य काही वेगळेच समोर आले आहे.

सोशल मीडियावरील दाव्यांचा पाऊस

ट्विटर (X) आणि इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये पोलीस मोठ्या ताफ्यासह सर्च ऑपरेशन करताना दिसत आहेत. 'क्रिएटली मीडिया' सारख्या हँडलवरून असा दावा करण्यात आला की, 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाच्या प्रभावामुळे पाकिस्तानी पोलीस आता घाबरले असून ते 'हमजा' (चित्रपटातील पात्र) सारख्या जासूसांचा शोध घेत आहेत. या व्हिडिओंना लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, नेटिझन्सनी पाकिस्तानची मोठी फिरकी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडिओचे वास्तव

इंटरनेटवर व्हायरल होणारे हे व्हिडिओ प्रत्यक्षात नवीन नाहीत. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, हे व्हिडिओ कराचीतील लयारी परिसरातील एका जुन्या पोलीस ऑपरेशनचे आहेत. साधारणपणे जुलै २०२५ च्या सुमारास हे व्हिडिओ पहिल्यांदा समोर आले होते, जे पोलिसांच्या रुटीन चेकिंगचा भाग होते. या मोहिमेचा 'धुरंधर २' चित्रपटाशी किंवा कोणत्याही भारतीय जासूसाच्या शोधाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

'धुरंधर २' मधील थ्रिलिंग कथानक आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेले भाष्य यामुळे तिथल्या राजकारण्यांमध्ये आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समध्ये आधीच संतापाचे वातावरण आहे. याच वातावरणाचा फायदा घेत काही स्थानिक कंटेंट क्रिएटर्सनी जुन्या व्हिडिओंना चित्रपटाशी जोडून व्हायरल केले आहे. जासूसांना पकडणे इतके सोपे नसते आणि अशा मोहिमा अत्यंत गुप्त असतात, हे विसरून जनतेने मात्र या व्हिडिओंवर मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT