Actor Dharmendra  Dainik Gomantak
मनोरंजन

Dharmendra: 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटात 64 वर्षानंतर धर्मेंद्र यांनी बदलले नाव!

Dharmendra: कधी त्यांच्या चित्रपटांमुळे कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात.

दैनिक गोमन्तक

Dharmendra: बॉलीवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूडचे लाडके अभिनेते धर्मेंद्र हे चर्चेत आले आहेत.

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र शाहिदच्या आजोबांची भूमिका साकारत आहेत. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' 9 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाच्या सुरुवातीच्या क्रेडिट्सवरून असे दिसून आले की धर्मेंद्र यांनी त्यांच्या जन्माच्या वेळी दिलेले मधले आणि आडनाव त्यांच्या नावात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात त्याचे नाव धर्मेंद्र सिंग देओल असे आहे. अभिनेत्याला इंडस्ट्रीत 64 वर्षे पूर्ण झाली आहेत. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांचे जन्माचे नाव धरम सिंह देओल होते.

धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये केवल किशन सिंग देओल आणि सतवंत कौर यांच्या घरी झाला. १९६० मध्ये धर्मेंद्र नावाच्या अभिनेत्याची 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून प्रेक्षकांना ओळख झाली.

आता ९ फेब्रुवारीला रिलिज झालेला 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकून घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT