मनोरंजन

Entertainment: धनुषचा 'थिरुचित्रंबलम' 100 कोटी क्लबमध्ये सामिल

गोमन्तक डिजिटल टीम

दक्षिणेचा सुपरस्टार धनुष (South Superstar Dhanush) याची मुख्य भूमिका असलेल्या थिरुचित्रंबलम (Thiruchitrambalam) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक मित्रन आर जवाहर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'थिरुचित्रंबलम' जगभरात 100 कोटींची (100 Crore Club) कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 100 कोटींचा टप्पा गाठणारा धनुषचा पहिला तमिळ चित्रपट ठरला आहे.

चित्रपट उद्योगाचे निरीक्षक नागनाथन यांनी याबाबत ट्विट केले आहे. 'तिरुचित्रंबलम' हा तामिळनाडूमधील धनुषचा पहिला 30 कोटी रुपयांचा स्टॉक चित्रपट म्हणून उदयास आला आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. आणखी एक इंडस्ट्री ट्रॅकर रमेश बाला यांनी ट्विट केले की 'थिरुचित्रंबलम' ने रविवार (4 सप्टेंबर) पर्यंत यूएस बॉक्स ऑफिसवर 453,918 डॉलर कमावले होते आणि त्याच कालावधीत ऑस्ट्रेलियन बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 236,334 डॉलर कमावले होते.

दरम्यान, धनुषने त्याचा मोठा भाऊ सेल्वाराघवन दिग्दर्शित त्याच्या आगामी 'नाने वरुवेन' चित्रपटाच्या बाबत भाष्य केले आहे. तमिळमध्ये धनुषने ट्विट केले आहे की, "ओरे ओरु उरुक्कुले रेंदू राजा इरुंदरम. ओरु राजा नल्लावरम, ओरू राजा केतवरम" (एका राज्यात दोन राजे होते. एक चांगला राजा होता आणि दुसरा वाईट राजा होता). या चित्रपटाचा पहिला सिंगल बुधवारी प्रदर्शित होणार असल्याचेही अभिनेत्याने उघड केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT