Dhanush Dainik Gomantak
मनोरंजन

Dhanush: अन् धनुषचा लूक झाला व्हायरल! नव्या अवतारात अभिनेत्याला पाहून तुम्ही म्हणाल...

Dhanush: धनुष विविध माध्यमांतून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो.

दैनिक गोमन्तक

Dhanush: दाक्षिणात्य अभिनेता धनुष आपल्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. धनुषने आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. याबरोबरच चित्रपटांशिवायदेखील धनुष विविध माध्यमांतून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो.

आता देखील तो अशाच एका कारणामुळे धनुष चर्चेत आला आहे आणि हे कारण म्हणजे धनुषचा नवीन लूक. धनुषने आपल्या दोन्ही मुलांसहित तिरुपती बालाजीचं दर्शन घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याबरोबरच आपले केस दान करत त्याने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्याचा हा नवीन लूक चाहत्यांचा पसंतीस उतरला जात असून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.

धनुषसोबत त्याच्यादोन्ही मुलांनी यात्रा आणि लिंगाने देखील आपले केस दान केले आहेत. सोशल मिडियावर धनुष आणि त्यांच्या फॅमिलीचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. धनुषने तिरुपती मंदिरात पूजा करत आपले केस दान केल्याची चर्चा आहे. यावेळी दोन्ही मुलांसोबत धनुषचे आई-वडीलही उपस्थित होते.

दरम्यान धनुष कॅप्टन मिलर या आगामी चित्रपटात दिसून येणार आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी तेरे इश्क या चित्रपटात काम करण्यासाठी धनुषचा प्रसिद्ध चित्रपट रांझनाचे डायरेक्टर आनंद राय आणि धनुष पून्हा एकदा एकत्र येणार असल्याची घोषणा आनंद राय यांनी केली होती. आता धनुषचा हा नवीन लुक पाहून त्याचा आगामी चित्रपट D50 साठी असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT