Dhanush & Aishwarya Dainik Gomantak
मनोरंजन

Dhanush Aishwarya Divorce: धनुष अन् रजनीकांत यांची मुलगी 18 वर्षानंतर झाले वेगळे

धनुषने (Dhanush) पत्नी ऐश्वर्यापासून वेगळे होण्याची घोषणा केली असून या घोषणेने चाहत्यांना धक्का बसला आहे.

दैनिक गोमन्तक

साऊथचा सुपरस्टार धनुषने आज एक मोठी घोषणा करुन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. धनुषने (Dhanush) पत्नी ऐश्वर्यापासून वेगळे होण्याची घोषणा केली असून या घोषणेने चाहत्यांना धक्का बसला आहे.

दरम्यान, ''ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) यांची मुलगी आहे. धनुषने घोषणा करताना त्याने लिहिले, 'आम्ही 18 वर्षे एकत्र होतो ज्यामध्ये आम्ही एक पालक म्हणून एकत्र राहत होतो. या प्रवासात खूप चढ उतार पाहिले. आज आमचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी आता म्हणून वेगळे होत आहोत. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा.''

धनुष आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणी

धनुषच्या 'कदल कोंडाएं' या चित्रपटादरम्यान दोघेही पहिल्यांदाच भेटले होते. ऑनर ऑफ सिनेमाने ऐश्वर्याची धनुषशी ओळख करुन दिली. यावेळी ऐश्वर्याने तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन केले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याकडून धनुषला पुष्पगुच्छ देण्यात आला होता.

जेव्हा-जेव्हा दोघे एकमेकांना भेटायचे तेव्हा ते चर्चेचा विषय बनत. दोघांचे बरेच फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र धनुष याबाबत कधीच बोलत नव्हता. धनुष म्हणायचा की, ऐश्वर्या माझ्या बहिणीची मैत्रिण आहे. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

शिवाय, धनुष आणि ऐश्वर्याचे कुटुंबीयांना दोघांचं नातही मान्य होतं. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचे प्रेम अधिकृत करण्याचा निर्णय घेतला. 18 नोव्हेंबर 2004 रोजी दोघांनी पुन्हा सात फेरे घेतले. दोघांचे लग्न खूप ग्रँड झाले होते, ज्यामध्ये साऊथचे अनेक स्टार्संनी हजेरी लावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT