Taapsee Pannu Dainik Gomantak
मनोरंजन

Taapsee Pannu: तापसीवर कारवाईची मागणी; केली 'ही' चूक

Taapsee Pannu: तापसी पन्नूवर योग्य कारवाई न झाल्यास शेकडो तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिलाय.

दैनिक गोमन्तक

Taapsee Pannu: बॉलीवूडची अभिनेत्री तापसी पन्नूने काही दिवसांपूर्वी घातलेल्या दागिण्यांवरुन मोठा वाद सुरु झाला आहे. तापसीने घातलेले दागिने हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा असलेले होते. त्यामुळे या वादाने मोठे स्वरुप धारण केले आहे.

आता हिंद रक्षक संघटनेच्या संयोजकाने बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूविरोधात पोलीस ठाण्यात कारवाईबाबत अर्ज दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वी तापसी पन्नूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये तिने अशोभनीय कपडे घातले आहेत आणि तिच्या गळ्यात आराध्य देवी लक्ष्मी मातेचे लॉकेट घातलेले आहे.

तापसीचे हे कृत्य सनातन धर्माच्या भावनांचा अपमान करणारे आहे, असे म्हणत हिंद रक्षक संघटनेचे एकलव्य यांनी तापसीविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. तापसी पन्नूवर योग्य कारवाई न झाल्यास शेकडो तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिलाय.

त्यामुळे हिंद संघटनेचा इशारा लक्षात घेऊन आता तापसीवर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच, आता तापसी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT