Deepika Padukone Dainik Gomantak
मनोरंजन

दीपिका पदुकोणच्या नेकनेलसची रंगलीये चर्चा, किंमत ऐकून व्हाल थक्क

Deepika Padukone: 'मस्तानी' ने कान फेस्टिवलमध्ये घातलेल्या नेकलेसबद्दल जाणून घेऊया खास बाब कोणती आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या फ्रान्स मध्ये आहे. दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. या फेस्टिव्हलची ती ज्युरी आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटसाठी नुकताच दीपिकानं क्लासी लूक केला होता. ब्लँक कलरचा सूट आणि गळ्यामध्ये एक पँथरची डिझाइन असलेला नेकलेस परिधान केला होता. जाणून घेऊयात दीपिकाच्या या नेकलेसच्या वैशिष्ट्य काय आहे. (Deepika Padukone cannes film festival 2022 latest News)

दीपिकाच्या (Deepika Padukone) नेकलेसची किंमत चार कोटी 48 लाख रूपये आहे. हा नेकलेस 18 कॅरेट व्हाईट गोल्ड, एमराल्ड आणि डायमंडपासून तयार केला आहे. हे सर्व मिळून हा नेकलेस 19.05 कॅरेटचा आहे. दीपिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमुळे दीपिका सध्या सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत आहे. दीपिकने तेथील भारतीय पॅव्हेलियनमध्ये लोकांना संबोधित करताना सांगितले की, 'एक दिवस कान भारतात येईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांची (Movie) प्रतिष्ठा मोठी होईल.'

दीपिकाचा काही दिवसांपूर्वी 'गेहराईंया' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामधील दीपिकाच्या आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. दीपिकाच्या आगामी चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT