Deepika Padukone in Cannes Festival 2022 Dainik Gomantak
मनोरंजन

Cannes 2022: कान्सच्या शेवटच्या दिवशी दीपिका पदुकोण भावूक

Deepika Padukone Cannes 2022: 17 मे पासून सुरू झालेला चित्रपट जगतातील सर्वात मोठा महोत्सव 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022' आता संपला आहे.

दैनिक गोमन्तक

चित्रपट जगतातील सर्वात मोठा महोत्सव 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022', (Cannes Film Festival 2022) 17 मे पासून सुरू झालेला, 29 मे रोजी संपला आणि कलाकार आपापल्या घरी परतले आहेत. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राॅय, अभिषेक आणि आराध्यासोबत मुंबई विमानतळावर दिसली होती. त्याचबरोबर दीपिका पदुकोणही मुंबईत परतली आहे. विमानतळावरून बाहेर पडताना दीपिकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर आले आहेत. यामध्ये तिने हिरव्या रंगाचा डेस परिधान केला आहे. कान्सच्या शेवटच्या दिवशी दीपिका खूपच भावूक दिसत होती. (Deepika Padukone Cannes 2022 News)

दिपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या इंस्टाग्राम अकाऊटवर कान्सच्या शेवटच्या दिवसाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ति ढसाढसा रडताना दिसत आहे. इतकंच नाही तर दीपिकाची टीमही रडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दीपिका म्हणते, 'आम्ही येथून जात आहोत आणि सर्वजण खूप नाराज आहेत'. यानंतर दीपिका आणि तिची टीम रडताना दिसत आहे. मात्र, दीपिकाचे भावूक होण्यामागे एक ट्विस्ट होता.

दीपिका खूप रडत नाही, पण तिने या व्हिडिओसाठी (Video) रडणारा फिल्टर वापरला आहे, जो आजकाल इन्स्टाग्राम (Instagram) रील्समध्ये खूप वापरला जात आहे. हा फिल्टर पाहून खुद्द दीपिकालाही हसू आवरत नाही. व्हिडिओमध्ये ती म्हणतेय, 'पहिल्यांदा मला वाटलं की ती रडत आहे. पण नंतर मला ओह्ह, ये तो फिल्टर है' दिसलं. फिल्टर पाहून दीपिका हसायला लागली. दीपिकाचा हा लूक पाहून रणवीर सिंगलाही हसू आवरता आले नाही. दीपिका कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes 2022) ज्युरी म्हणून दिसली होती. दीपिकाने तिच्या आउटफिट्स आणि लूकमुळे सोशल मिडीयावर चर्चेत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT