Irfan Pathan Debut Film Cobra Twitter
मनोरंजन

Cobra: इरफान पठाणच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पडद्यावर दिसणार पोलिसाच्या भूमिकेत

क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत बाजी मारणारा इरफान पठाण 'कोब्रा' या तमिळ चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवणार आहे.

दैनिक गोमन्तक

Irfan Pathan Debut Film Cobra: क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत बाजी मारणारा इरफान पठाण 'कोब्रा' या तमिळ चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा क्रिकेटर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. अजय ग्यानमुथु दिग्दर्शित हा चित्रपट 31 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात इरफानसोबत तमिळ अभिनेता चियान विक्रम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करून सहकारी क्रिकेटपटू सुरेश रैनाने या चित्रपटाविषयीची उत्सुकता व्यक्त केली.

क्रिकेटरचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आता अभिनयातही हात आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. तो 'कोब्रा' चित्रपटातून डेब्यू करत आहे. सुरेश रैनाने इंस्टाग्रामवर 'कोब्रा'चा ट्रेलर शेअर केला आणि अभिनंदन करत लिहिले, 'इरफान पठाण तुला कोब्रामध्ये परफॉर्म करताना पाहून मला खूप आनंद झाला. चित्रपटाच्या यशाबद्दल मी तुमचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. थेटरमध्ये पाहण्यासाठी आता प्रतीक्षा करू शकत नाही'.

पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील इरफान पठाण

या चित्रपटासाठी अनेक क्रिकेटप्रेमी आणि चित्रपट चाहतेवाट पाहत आहे. क्रिकेटच्या मैदानावर धमाकेदार खेळी खेळणारा इरफान पडद्यावर कसा परफॉर्म करतो हे पाहण्याची उत्सुकता आहे. 'कोब्रा' चित्रपटाला संगीत प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी दिले आहे. या चित्रपटात इरफान इंटरपोल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

2020 मध्ये एका तमिळ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या इरफान पठाणने त्याच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटात काम करण्याबाबत माहिती देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. तेव्हा आता हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. आउट ऑफ द बॉक्स चित्रपट बनवणाऱ्या चियान विक्रमलाही या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. हा चित्रपट तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT