Pradeep Uppoor Passes Away  Dainik Gomantak
मनोरंजन

Pradeep Uppoor Passes Away: CID चे निर्माते प्रदिप उप्पर यांचं निधन,शिवाजी साटम झाले भावुक

कित्येक वर्षे टेलिव्हिजनवर राज्य करणाऱ्या सीआयडी मालिकेच्या निर्मात्याचे नुकतेच निधन झाले आहे.

Rahul sadolikar

Pradeep Uppoor Passes Away: सीआयडी हा टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त काळ चालणारा शो आहे. ज्या काळात मालिकांची सुरूवात झाली त्याच काळात या मालिकेने प्रेक्षकांवर गारुड घातले होते. घराघरात या मालिकेला स्वीकारले गेले.

 ए. सीपी प्रद्युम्नपासून ते दया आणि अभिजीतपर्यंत या शोमधील व्यक्तिरेखा आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. लहान मुलांपासुन ते आजी- आजोबापर्यंत सगळेच या मालिकेचे फॅन्स होते. आज या मालिकेच्या संदर्भात एक वाईट बातमी समोर आली आहे.

हा शो सोनी वाहिनीवर जवळपास 20 वर्षांपासून प्रसारित होत आहे. या शोचा शेवटचा भाग 27 ऑक्टोबर 2018 मध्ये झाला होता.

लोकांनी आपल्या कुटुंबासह मोठ्या उत्साहात या शोचा आनंद लुटला. इतके दिवस CID सारख्या शोद्वारे लोकांचे मनोरंजन करणारे निर्माते प्रदीप उप्पर यांचे निधन झाले आहे.

हा शो सोनी वाहिनीवर जवळपास 20 वर्षांपासून प्रसारित होत आहे. या शोचा शेवटचा भाग 27 ऑक्टोबर 2018 मध्ये झाला होता. लोकांनी आपल्या कुटुंबासह मोठ्या उत्साहात या शोचा आनंद लुटला. इतके दिवस CID सारख्या शोद्वारे लोकांचे मनोरंजन करणारे निर्माते प्रदीप उप्पर यांचे निधन झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते अखेर त्यांनी सिंगापूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. अभिनेते शिवाजी साटम यांनी निर्मात्याच्या निधनाची माहिती दिली

शिवाजी साटम उर्फ ​​एसीपी प्रद्युम्न यांनी सोमवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून निर्माता प्रदीप उपूर यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी प्रदीप उपूर यांचा फोटो ट्विट केला असून त्यावर 'हम आपके याद करेंगे' असे लिहिले आहे.

हा फोटो ट्विट करत अभिनेते शिवाजी साटम यांनी लिहिले की, 'प्रदीप उपूर (सीआयडी शोचे आधारस्तंभ आणि निर्माता), माझा मित्र जो नेहमी हसतमुख, प्रामाणिक आणि मनाने खूप शुद्ध, बॉस तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यात खूप बदल झाला आहे.

पुढे अभिनेते शिवाजी साटम म्हणतात "एक अद्भुत अध्याय संपुष्टात आला आहे. तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुझी खूप आठवण येते'. निर्माता प्रदीप यांच्या निधनाची बातमी देताना शिवाजी साटम यांनी शोक व्यक्त केला आहे".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

SCROLL FOR NEXT