Brahmastra Latest News Dainik Gomantak
मनोरंजन

Brahmastra: आलिया-रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र'ने रिलीज आधीच रचला इतिहास

Brahmastra Latest News: 'ब्रम्हास्त्र' सिनेमाने रिलीज होण्यापूर्वीच वॉल्ट डिस्ने स्टुडिओ पिक्चर्सच्या ग्लोबल रिलीज कॅलेंडरमध्ये स्थान मिळवले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. अयान मुखर्जीच्या (Ayan Mukerji) बहुप्रतीक्षित 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच एक विक्रम नोंदवला आहे. वॉल्ट डिस्ने स्टुडिओ पिक्चर्सच्या ग्लोबल रिलीज कॅलेंडरमध्ये स्थान मिळवून हा भारतातील पहिला चित्रपट ठरला आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt latest movie Brahmastra News)

अयान मुखर्जीने 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर करण जोहरने चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये आलिया-रणबीरसह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), मौनी रॉय (Mouni Roy), अक्किनेनी नागार्जुन (Nagarjun Akkineni) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'ब्रह्मास्त्र’ या सिनेमाची घोषणा ऑक्टोबर 2017 मध्ये झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये या चित्रपटाचे (Movie) शूटिंग सुरू झाले. याआधी जून आणि नंतर सप्टेंबर 2019 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग वाराणसीमध्ये झाले होते. या चित्रपटाद्वारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT