Alia-Ranbir  Dainik Gomantak
मनोरंजन

सेम टू सेम! आलिया- रणबीरने कॉपी केली कतरिना-विकीच्या वेडिंग आयडिया

रणबीर आणि आलियाच्या लग्नाला अवघे काही दिवस राहिले असून हे दोघे या खास दिवशी काय परिधान करणार आहेत याची जोरदार चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मिडियावर जोरदार सुरू आहेत. या दोघांच्या लग्नाची तयारी देखील सुरू झाली आहे. लग्नाला अवघे काही दिवसच राहिले असून या लग्न सोहळ्यात रणबीर आणि आलिया कोणते ड्रेस परिधान करणार आहेत याची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. रणबीर आणि आलिया त्यांच्या स्टाइलसाठी नेहमीच चर्चेत असतात यामुळे हे दोघे लग्नात कोणते ड्रेस परिधान करणार आहेत याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (Ranbir Kapoor-Alia Bhatt's wedding dress Latest News)

आलिया (Alia Bhatt) आणि रणबीरच्या लग्नासंबंधी काही माहिती समोर आली आहेत. या लग्न सोहळ्यात आलिया सब्यसाची मुखर्जीचा डिझाईन केलेला लेहेंगा परिधान करणार मनीष मल्होत्राचा डिझाईन केलेला दुपट्टा आणि सब्यसाचीचा गुलाबी रंगाचा लेहेंगा घालणार आहे. तर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) देखील ब्रँडेड कपड्यांमध्ये हटके अंदाजामध्ये दिसणार आहे. रणबीरच्या लग्नाचा ड्रेस मुंबईतील त्याच्या 'वास्तू' या निवासस्थानी पोहोचला आहे. इटाइम्सच्या रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर त्यांच्या लग्नात कस्टमाइज्ड फूटवेअर परिधान करणार आहेत. कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी त्यांच्या लग्नासाठी 'जॉय' हा ब्रॅंड निवडला होता आणि हाच ब्रॅंड आलिया आणि रणबीरने निवडल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर आणि आलिया कपूर यांच्या पाली हिल येथील 'कृष्णा राज' बंगल्यात (krishna raj bungalow) लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्न सोहळ्याला आणखी खास बनवण्यासाठी हा बंगला लाईटिंग्सने सजवला गेला आहे. लग्नाआधी रणबीरचा 'आरके स्टुडिओ' देखील रोषणाईने सजवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT