Sonam Kapoor Ahuja Instagram /@Sonam Kapoor Ahuja
मनोरंजन

सोनम कपूरने बेबी बंपचे फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

सोनम कपूरने बेबी बंपचे काही सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना प्रेग्नेंसीची माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) बेबी बंपसह काही फोटो शेअर करत प्रेग्नेंसीची गोड बातमी दिली आहे. सोनम कपूरने 2018 मध्ये बिझनेसमन आनंद आहुजासह लग्न केले . लग्नानंतर जवळपास 3 ते 4 वर्षानंतर ती गरोदर असून पती आनंदसोबत काही सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना प्रेग्नेंसीची माहिती दिली आहे. हे फोटो शेअर करताच काही मिनिटांमध्येच या पोस्टवर चाहत्यांनी आणि बॉलीवुड (Bollywood) कलाकारांनी लाईक्स आणि कॅमेन्टचा वर्षाव केला.

बेबी बंप फोटो शेअर दिली गोड बातमी

सोनम कपूरने (Sonam Kapoor) शेअर केलेल्या फोटोमध्ये काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. आनंद आहुजाच्या मांडीवर डोक ठेवून सोफ्यावर झोपलेली दिसत आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.

या फोटोला सोनम कपूरने सुंदर कॅप्शनसह दिले आहे, "आम्ही बाळाची सर्वोत्तम काळजी घेउ. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमी पाठीशी असणार आहोत. आम्ही बळावर खूप प्रेम करू आणि बाळाचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.सोनम कपूरच्या या पोस्टवर करीना कपूर, दिया मिर्झा,अनन्या पांडे यासरख्या अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 'द झोया फॅक्टर' या चित्रपटामध्ये सोनम कपूर शेवटचे काम केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT