Parineeti Chopra | Raghav Chadha Dainik Gomantak
मनोरंजन

चर्चेला उधाण आलंया! परिणिती-राघव यांच्या साखरपुड्याची तारीख ठरली? दोघांचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियात 'रागनीती' नावाने प्रसिद्ध झाले आहे हे कपल

Akshay Nirmale

गेल्या काही महिन्यांपासून आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असलेले आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि चित्रपट अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या एंगेजमेंटची (Engagement) तारीख निश्चित झाली आहे, अशी माहिती आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टी (AAP) खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) हे जोडपे आयपीएल मॅचमध्ये किंवा डिनर डेटवर वारंवार एकत्र दिसले आहे. 13 मे रोजी ते एंगेजमेंट करणार असल्याची माहिती आहे. एकीकडे या तारखांच्या वावड्या सुरू असतानाच आज, मंगळवारी दोघेही दिल्लीत आले.

(Parineeti Chopra - Raghav Chadha Engagement Date)

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा याआधी मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. आता, त्यांच्या एंगेजमेंटच्या आधी, अफवा असलेले जोडपे नवी दिल्लीत आले आहेत. परिणीती लाल रंगात सुंदर दिसत होती, तर राघवने कॅज्युअलमध्ये ती साधी ठेवली होती.

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. जेव्हा पॅपराझींनी त्यांना पोज देण्यास सांगितले तेव्हा ते दोघेही लाजले. एकाने चड्ढा यांना स्माईल करायला सांगत वडिलांना लग्नाला बोलवणार का, असा सवालही केला.

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे याच महिन्यात शनिवारी, १३ मे रोजी साखरपुडा करत असल्याची माहिती आहे. याला आम आदमी पक्षानेही दुजोरा दिला आहे. मात्र, या दोघांना याविषयी विचारल्यावर त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले.

एंगेजमेंट सोहळ्याची सुरुवात 'अरदास'ने होईल आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम होईल जिथे ते एकमेकांना अंगठी घालतील. या जोडप्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र या सोहळ्यात सहभागी होणार आहेत, असे कळते.

सूत्रांच्या माहितीनुसार परिणिती आणि राघव यांच्या लग्नातील रोका हा कार्यक्रम पार पडला आहे. हा कौटुंबिक कार्यक्रम होता. दरम्यान, या वर्षाच्या ऑक्टोबर अखेर दोघे लग्न करतील, अशी माहिती आहे.

या दोघांच्या डेटिंगची बातमी पहिल्यांदा मार्च महिन्यात समोर आली होती, दोघे एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघेही दिल्ली-मुंबईत अनेक ठिकाणी एकत्र दिसले. एकदा राज्यसभेतही सभापती जगदीप धनखड यांनी राघव चढ्ढा यांना यावरून छेडले होते.

तर एएनआयच्या रिपोर्टरने राघव यांना परिणीतीशी लग्नाबद्दल प्रश्न विचारल्यावर राघव यांनी राजकारणावर प्रश्न विचारा, असे म्हटले होते. दरम्यान, सेलिब्रिटी कपलची नावे जशी दोघांच्या नावावरून ठेवली जातात, तसेच या कपलचेही नवे नाव सध्या गाजते आहे. सोशल मीडियात 'रागनीती' असे नाव या जोडप्याला मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT