Nataliya Kozhenova insta/Nataliya Kozhenova
मनोरंजन

कुटूंबाला काही झाले तर मी अनाथ होईल: बॉलीवूड अभिनेत्री नतालिया

बॉलीवूडमध्ये काम करणारी युक्रेनियन अभिनेत्री नतालिया कोझेनोव्हाला कुटूंबियांची काळजी

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात दहशत पसरली आहे. दोन्ही देशांमध्ये सतत बॉम्बस्फोट होत आहे. या युद्धाचा सर्वाधिक परिणाम युक्रेनवर होत आहे. हजारो युक्रेनियन लोकांना त्यांची घरे सोडण्यास भाग पाडले गेले आहे. इतर देशांमध्ये स्थायिक झालेले बरेच लोक युक्रेनमधील त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि मित्रांबद्दल काळजीत आहेत. बॉलीवूडमध्ये काम करणारी युक्रेनियन अभिनेत्री नतालिया कोझेनोव्हाने (Nataliya) देखील तिच्या कुटूंबाबद्दल काळजी व्यक्त केली आहे.

नतालियाला कुटुंबाची काळजी

टाइम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संवादात नतालियाने युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीत अडकलेल्या तिच्या कुटुंबाबद्दल चिंता व्यक्त केली.'माझे संपूर्ण कुटुंब, माझी आई वडील, दोन भाऊ, दोन पुतणे युक्रेनच्या रिव्हने (Rivne) शहरात राहतात. माझ्या देशातील परिस्थिती गंभीर आहे. रशियाने आपल्यावर अतिशय आक्रमकपणे आणि अनेक प्रकारे हल्ले केले आहेत. मी माझ्या आईशी बोलले तिने मला सांगितले की रशियन सैन्य त्यांच्या शहराजवळ येत आहे आणि त्यांना घर रिकामे करण्यास आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मृत्यूच्या भीतीमुळे माझ्या कुटुंबाने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. आता मला त्यांच्याशी संपर्क साधता येत नाही,' असे म्हणत नतालियाने आपल्या कुटूंबियांप्रती चिंता व्यक्त केली.

कुटुंबाला काही झाले तर मी अनाथ होईल: नतालिया

तिची इच्छा आहे की तिचे कुटुंब भारतात यावे पण त्यांना परत आणण्याचा कोणताही पर्याय तिच्याकडे नाही.'माझ्या कुटुंबाला काही झाले तर मी अनाथ होईल. मला त्याच्याशिवाय कोणीही नाही, असे म्हणच तिने भारत युक्रेनला पाठिंबा देईल अशी आशा व्यक्त केली आहे.

युक्रेनियन अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये एंट्री

युक्रेनियन अभिनेत्री नतालिया बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी काही वर्षांपूर्वी भारतात आली होती. अत‍िथ‍ि तुम कब जाओगे, अंजुना बीच, सुपर मॉडल, तेरे जिस्म से जान तक, बोले इंड‍िया जय भीम, लव वर्सेज गैंगस्टर, वेब सीरील गंदी बात मध्ये तिने काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT