Janhvi Kapoor on Vijay Sethupathi: Dainik Gomantak
मनोरंजन

Janhvi Kapoor on Vijay Sethupathi: जान्हवीने साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीला 'या' कारणासाठी केला होता फोन

जान्हवीच्या प्रेम असल्याचे सांगताच विजय सेतुपती झाला आश्चर्यचकीत

Akshay Nirmale

Janhvi Kapoor on Vijay Sethupathi: साऊथ सुपरस्टार तमिळ अभिनेता विजय सेतुपती याची फॅन फॉलोविंग मोठी आहे. बॉलीवुडचा किंग खान शाहरूख पासून ते रजनीकांत यांनी देखील विजय सेतुपतीचे कौतूक केले आहे. नुकतचे बॉलीवुडमधील ताज्या दमाची अभिनेत्री जान्हवी कपूर हीने देखील एका कारणासाठी विजय सेतुपतीला कॉल केला होता, अशी माहिती दिली आहे.

जान्हवी कपूर हीने नुकतेच एका मुलाखतीत दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करायची इच्छा व्यक्त केली आहे. जान्हवी तिला कोणत्या दाक्षिणात्य कलाकारांसोबत काम करायला आवडेल, यांच्याविषयी माहिती दिली. तसेच तिने साऊथ सुपरस्टार अभिनेता विजय सेतुपतीला फोन केला होता, असेही सांगितले.

जान्हवी म्हणाली की, विजय सेतुपती सर मला आवडतात. माझे प्रेम आहे त्यांच्यावर. मी त्यांची खुप मोठी फॅन आहे. जेव्हा मला कळले की कुणाकडे त्यांचा नंबर आहे, तेव्हा मी लगेचच फोन घेऊन त्यांना कॉल केला. मी त्यांना म्हटले की, मी तुमची खूप मोठी फॅन आहे, जर माझ्यासाठी तुमच्याकडे काही काम असेल तर मला ऑडिशन द्यायला आवडले. मला तुमच्यासोबत काम करायचे आहे.

माझ्या फोनमुळे विजय सेतुपतींना धक्का बसला होता. फोनवरील संपुर्ण चर्चेत ते केवळ 'अयो, आओ' असेच म्हणत होते. माहिती नाही ते नाराज झाले की लाजले. पण त्यांना आश्चर्य वाटले होते. कारण मी अत्यंत एक्साईटमेंटने बोलत होते. पण ते गप्पच राहिले.

दरम्यान, गेल्या चार वर्षात जान्हवीने बॉलीवुडमध्ये स्वतःची ओळख बनवली आहे. जान्हवीच्या 'मिली' चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळालेला नव्हता. आगामी काळात ती 'मिस्टर अँड मिसेस माही', 'बवाल', 'तख्त', 'दोस्ताना 2' आणि 'किट्टी' या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT