Actors Dainik Gomantak
मनोरंजन

Bollywood: या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटात एकत्र दिसणार संजय दत्त, मिथुन, सनी देओल, जॅकी

Bollywood: 'या' बहुचर्चित चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Bollywood: बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता (Actor) सनी देओल सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. या चित्रपटात सनी देओलशिवाय 80 आणि 90 च्या दशकातील सुपरस्टार जॅकी श्रॉफ, संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती एकत्र दिसणार आहेत. या चारही कलाकारांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत अगोदर काम केले आहे. मात्र आता बऱ्याच काळानंतर ते एकाच चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे (Film) पोस्टर समोर येताच चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या सर्व दिग्गजांना एकत्र पाहिल्यावर पुन्हा एकदा ९० चे दशक परत आल्यासारखे वाटते. मात्र, या चित्रपटाचे नाव काय असेल? याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. पण या चित्रपटाचे पोस्टर चारही कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. फर्स्ट लुक शेअर करताना संजय दत्तने लिहिले की, “सर्व चित्रपटांचा बाप. धमाल शूटींग झालं, दोस्ती भारी आहे ."

या पोस्टरमध्ये चारही कलाकार कॅमेऱ्यासमोर जबरदस्त लूक देताना दिसत आहेत. मिथुन चक्रवर्तीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, मिथुन चक्रवरर्तीने (Mithun Chakraborty) हाफ स्लीव्ह लेदर जॅकेट घातलेले दिसते. डोक्यावर टोपी आणि कपाळावर टिळा आहे. तसेच गळ्यात काळी मफलर घातली आहे. दुसरीकडे, सनी देओलने केशरी आणि पांढऱ्या रंगाचा कैद्याचा ड्रेस परिधान केला आहे. यात त्याचे लांब केस असून कपाळावर पांढरी पट्टी दिसते आहे.

संजय दत्तचा (sanjay datt) कुल लूक यात आहे. यामध्ये तो तपकिरी रंगाचे जाकीट आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. जॅकी श्रॉफच्या लूकबद्दल सांगायचे तर, या पोस्टरमध्ये तो एकदम रावडी लूकमध्ये दिसतोय. गळ्यात रुमाल घालण्याची त्याची नेहमीची स्टाईल इथे कॅरी करताना तो दिसतो आहे, जो खूपच छान दिसत आहे.

हे पोस्टर शेअर करताना जॅकी श्रॉफने लिहिले की, जिथे चार यार भेटतात.अरे.. चौथा भिडू कुठंय. यार तू पहिल्याच दिवशी बंक करुन बसला आहे. भावा, तू कुठे आहेस यार? जॅकी श्रॉफने केलेल्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या बहु्चर्चित चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक चौहान करत आहेत. तसेच अहमद खान, शायरा अहमद खान आणि झी स्टुडिओ मिळून याची निर्मिती करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT