Varun Dhawan and Priyanka Chopra on OTT News, Varun Dhawan OTT Debut,
Varun Dhawan and Priyanka Chopra on OTT News, Varun Dhawan OTT Debut,  Instagram
मनोरंजन

देसी गर्ल सोबत ओटीटीवर दिसणार वरुण धवन

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील अभिनेता वरुण धवननेही (Varun Dhawan) ओटीटीच्या जगात पाऊल ठेवण्याची तयारी केली आहे. अलीकडेच, त्याचे ओटीटीमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वरुण धवन लवकरच देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि रिचर्ड मॅडन अभिनीत अॅक्शन-पॅक अमेरिकन स्पाय थ्रिलर 'Citadel' च्या भारतीय स्पिन-ऑफमध्ये दिसणार आहे . (Varun Dhawan OTT Debut)

* ओटीटी डेब्यू करण्याबाबत वरुण धवनचा खुलासा

वरुण धवनने (Varun Dhawan) सांगितले की त्याला ओटीटी प्लॅटफॉर्म आवडतो. काहीतरी मनोरंजक शो घेऊन तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासाठी तो खुप उत्सुक आहे. पण त्याने या शोबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. तर प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या लंडनमध्ये एक सिरिजच्या (Series) शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ही सिरिज 'अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम'चे दिग्दर्शक जो आणि अँथनी रुसो दिग्दर्शित करत आहेत.

वरुण धवन आगामी चित्रपट 'जुग जुग जियो' आणि 'भेडिया या चित्रपटांमध्ये (Movie) दिसणार आहे. जुग जुग जिओ'मध्ये वरुणसोबत अनिल कपूर, नीतू कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर 'भेडिया' या चित्रपटात वरुणसोबत कृती सेनन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते या चिटपटांना आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईसाठी 7 वर्षांची मुलगी ठरली 'देवदूत'; सतर्कता दाखवत वाचवला जीव

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT